Mahatma Gandhi | महात्मा गांधी

Mahatma Gandhi | महात्मा गांधी

Mahatma Gandhi | महात्मा गांधी
मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते. सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते. त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.
Read More
Gautama Buddha | गौतम बुद्ध

Gautama Buddha | गौतम बुद्ध

Gautama Buddha | गौतम बुद्ध
Gautama Buddha | गौतम बुद्ध बुद्ध (इ.स.पू. ६२३/ ५६३ – इ.स.पू. ५४३/ इ.स.पू. ४८) हे भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते. त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली. गौतम बुद्ध, शाक्यमूनी बुद्ध, सिद्धार्थ गौतम, सम्यक सम्मासंबुद्ध ही त्यांची अन्य नावे आहेत. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्‍नी महाराणी महामाया (मायादेवी) यांच्या पोटी क्षत्रिय कुळामध्ये इ.स.पू. ५६३ मध्ये लुंबिनी येथे बुद्धाचा जन्म झाला. या राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ (पाली भाषेत सिदत्थ गोतम) असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामाया यांचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमी यांनी केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. इ.स.पू. ५४७ मध्ये यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह झाला व पुढे त्यांना…
Read More
Gautama Buddha | गौतम बुद्ध

Gautama Buddha | गौतम बुद्ध

Gautama Buddha | गौतम बुद्ध
Gautama Buddha | गौतम बुद्ध "बुद्ध" हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे 'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी' आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे. ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. बुद्धांच्या धम्माला (धर्माला वा तत्त्वज्ञानाला) ‘बौद्ध धर्म' किंवा ‘बुद्धिझम’ म्हणतात. तथागत बुद्धांचा अनुयायांत दोन भाग पडतात. एक — बौद्ध भिक्खू - भिक्खूनींचा आणि दुसरा — बौद्ध उपासक - उपासिकांचा. बौद्ध धर्माच्या अनुयायांना "बौद्ध" किंवा "बुद्धिस्ट" म्हणतात. Gautama Buddha | गौतम बुद्ध  
Read More
Va. Pu. Kale | व. पु. काळे

Va. Pu. Kale | व. पु. काळे

Vasant Purushottam Kale | व. पु. काळे
वपु काळे पेशाने वास्तुविशारद म्हणजेच आर्किटेक्ट होते. त्यामुळे सौंदर्यदृष्टी नोकरीचाच भाग असल्याने जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोनच वेगळा होता. त्यांच्यामधील लेखक जग पहायचा मग वपु पहायचे. म्हणूनच त्यांनी कदाचित शब्दांचे राजवाडे आणि महाल बांधले असावेत.
Read More