Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

प्रश्न उत्तर
लोणार सरोवर लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे तिसरा सरोवर आहे. याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली. हे सरोवर औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.तसेच या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत.आणखीन मंदिरे आहे. सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते.[३] पण २०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय ५,७०,००० ± ४७,००० वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था(U.S.A), युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी ,इंडिया इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि ,खारगपूर (इंडिया )यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.
Read More