Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

प्रश्न उत्तर
  पंढरपूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका आहे. पंढरपूर हे गाव भीमा नदीच्या (चंद्रभागा) काठावर वसले आहे. पंढरपुराला पंढरी असेही म्हणतात. पंढरपूरची लोकसंख्या ५३,६३८ (१९७१) इतकी आहे. पंढरपूर हे सोलापूरच्या पश्चिमेस ७१ किमी. वर, भीमा नदीच्या उजव्या तीरावर, समुद्रसपाटीपासून ४५० मीटर उंचीवर आहे. आहे. हे मिरज-कुर्डुवाडी रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक असून येथून महाराष्ट्रात सगळीकडे जाणारी बस वाहतुकीची सोय आहे. काही मध्ययुगीन कानडी शिलालेखांत पंढरपूर या क्षेत्राचे नाव नाव 'पंडरगे' असे आहे.मूळ नाव पुंडरीकपूर असे असावे किंवा पांढरी (गावाची वेस) या शब्दाशीही प्रस्तुत क्षेत्राच्या नावाचा संबंध असण्याची शक्यता आहे.   Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा
Read More