चालू घडामोडी : 20 जानेवारी २०२४

चालू घडामोडी : 20 जानेवारी २०२४

  • महाराष्ट्रातील मुंबई येथे देशातील सर्वात मोठ्या अटल सागरी सेतूचे नुकतेच उदघाटन करण्यात आले.या पुलाची लांबी २१.८ किलोमीटर आहे. समुद्रावर साधारण १६.५ तर जमिनीवर साधारण ५.५ किलोमीटर पूल आहे.

  • उत्तर प्रदेश : नीती आयोगाच्या दारिद्य्र अहवालानुसार उत्तर प्रदेश राज्याने गरिबीत सर्वाधिक नोंदवली आहे.

  • ICC Players Of The Month – डिसेंबर २०२३:
   • पुरुष – पॅट कमिन्स
   • महिला – दिप्ती शर्मा

  • भारत सरकारने २०३० पर्यंत रस्ते अपघातातील मृत्यू ५० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

  • FIFA फुटबॉल पुरस्कार २०२३ : लिओनेल मेस्सी

  • १६ जानेवारी हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा केला जातो.

  • गुवाहाटी येथे ‘राष्ट्रीय औषध शिक्षण आणि संशोधन’ संस्थेचे उदघाटन करण्यात आले आहे.

  • जानेवारी २०२४ मध्ये Apple ला पराभूत करून Microsoft ही जगातील सर्वात मौल्यवान कंपनी बनली आहे.

  • GI टॅग : अयोध्या येथील बेसनाच्या लाडूला GI टॅग देण्यात आला आहे.

  • ऑपरेशन सर्वशक्ती : पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सर्वशक्ती सुरु केले आहे.

  • SAMBHAV : भारतीय लष्कराने एन्ड टू एन्ड सुरक्षित मोबाइल इकोसिस्टिम तयार केली आहे.

Spread the love