व.पु. काळे | Va Pu Kale

Vasant Purushottam Kale | va pu kale

व.पु.काळे | Va Pu Kale

व. पु. काळे | Vasant Purushottam Kale, हे मराठी भाषेतील खूप मोठे लेखक होते. ते वपु काळे या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी ६० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. पार्टनर, वपुर्झा, ही वाट एकटीची , ठिकरी ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.

ते प्रसिद्ध कथाकथनकार होते. त्यांचे १,६०० पेक्षा जास्त कथाकथनाचे कार्यक्रम झाले होते. ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून येणारे ते पहिले मराठी लेखक आहेत. त्यांनी भरपूर कथासंग्रह लिहले आहेत. काळे हे व्यवसायाने आर्किटेक्ट होते. २६ जून २००१ रोजी मुंबई येथे त्यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांच्या राहत्या घरामध्ये निधन झाले.

लेखक व. पु. काळे यांनी आयुष्यावर भरभरून लिहिले आहे. असेच काही त्यांचे प्रसिद्ध आणि आयुष्याला प्रेरणा देणारे कोट्स आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. व. पु. काळे यांचे लिखाण इतके सुंदर आहे की मराठी साहित्यामध्ये या लिखाणाला विशेष स्थान आहे.

Va Pu Kale yanche suvichar

"सहवासाचा आनंद पैशात मांडता येत नाही ."

V.P Kale Thoughts & Quotes

"छान राहायचं ... हसायचं !
पोटात ज्वालामुखी असतानाही ,
हिरवीगार झाडं जमिनीवर दिसतातच ना ?"

व.पु.काळे | Vasant Purushottam Kale

"अश्रू फक्त स्वतःची वकिली करतात .
वाहणाऱ्या डोळ्यांना स्वतःच्या चुका दिसत नाही ."

va pu kale suvichar in marathi

"भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती,
आणि वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती."

vapurza

"कोणत्याही सुखाच्या क्षणी आपण होशमध्ये असणं
यातच त्या क्षणाची अपूर्वाई आहे."

va pu kale quotes on life in marathi

"सगळे वार परतवता येतील पण अहंकारावर झालेला वार
परतवता येत नाही आणि पचवताही येत नाही."

va pu kale quotes on life in marathi,

"बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं
समोरच्यापर्यंत न पोचणं ही शोकांतिका जास्त भयाण."

va pu kale quotes on life in marathi,

सौंदर्य
‘स्त्री’ला जन्माला घालताना परमेश्वराने तिला विचारले ,
‘तुला बुध्दी हवी का सौंदर्य?’ तेव्हा ती म्हणाली,
बुध्दीची गरज नाही, सौंदर्यच दे!
परमेश्वराने विचारले ‘का?
"बुध्दीच्या सामर्थ्यावर सौंदर्य मिळवता येत नाही,
पण सौंदर्याच्या जोरावर बुध्दी विकत घेता येते".

va pu kale quotes on life in marathi,

"ज्यांच्या असण्याला अर्थ असतो,
त्यांच्याच नसण्याची पोकळी जाणवते."

"संवाद दोनच माणसांचा होतो , त्यांच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात."

"घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत नेहमीच कमी असते."

"चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस."