मराठी म्हणी | Mhani In Marthi

ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण मराठी म्हणी | Mhani In Marthi  होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना ‘म्हण’ असे म्हणतात.


1. तहान लागल्यावर विहीर खणणे.
ज्या वेळेस गरज पडेल त्या वेळेस त्या गोष्टीच्या शोध घेणे .


2. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
दुष्ट व्यक्तींच्या कृत्याने चांगल्या माणसाचं नुकसान होत नाही.


3. लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण.
स्वतःला काहीही येत नाही पण लोकांना शहाणपणा सांगणे.


4. आधी पोटोबा मग विठोबा.
आधी स्वतःचा स्वार्थ साधने आणि मग दुसऱ्यांच्या विचार करणे


5. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.
अगोदरच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत अजुन आळशी अवस्था निर्माण होणे.


6. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
वाईट लोकांच्या कृतीने व बोलल्याने आपल्याला काही फरक पडत नाही .


7. आपला हात जगन्नाथ.
आपल्या कर्तृत्वावर आपली प्रगति अवलंबून असते.


8. अंथरूण पाहून पाय पसरावे.
आपली ऐपत पाहून वागावे आणि जगावे.


9. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.
प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय काही कळत नाही.


10. अति तेथे माती.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणे हे वाईटच असते .


11. आयत्या बिळात नागोबा.
दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे.


12. इकडे आड तिकडे विहीर.
दोन्ही बाजूंनी संकट असणे.


13. नाचता येईना अंगण वाकडे .
स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो.


14. कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे.
माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही.


15. अडला हरी गाढवाचे पाय धरी.
एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.


16. गरज सरो, वैद्य मरो.
गरज असेपर्यंत त्या माणसाशी संबंध ठेवणे आणि गरज संपल्यावर त्याला विसरुन जाने.


17. गाढवाला गुळाची चव काय?
ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही.


18. गोगलगाय न पोटात पाय.
बाहेरून निर्मल दिसणारी पण मनात कपट असणारी व्यक्ती.


19. अति शहाणा त्याचा बैल रिकामा.
जो माणूस खूप शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही.


20. उस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये.
कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा एखाद्याच्या चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.


21. एका हाताने टाळी वाजत नाही.
दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही किंवा एखाद्या कृत्यात दोघेही दोषी असणे.


22. ऐकावे जनाचे करावे मनाचे.
लोकांचे ऐकून घ्यावे व पण आपल्याला जे योग्य वाटेल तेच करावे.


23. कर नाही त्याला डर कशाला.
ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगावयाचे.


24. नाव मोठे लक्षण खोटे.
कीर्ती मोठी पण कृती छोटी.


25. काखेत कळसा नि गावाला वळसा.
हरवलेली वस्तु जवळ असतानाही इतरत्र शोधत राहणे.


26. टाकीचे घाव सोसल्यावाचुन देवपण येत नाही.
कष्ट सोसल्याशिवाय फळ मिळत नाही.


27. दुरून डोंगर साजरे.
कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते; परंतु जवळ आल्यावर तिचे खरे रूप समझते.


28. साखरेचा खाणार त्याला देव देणार.
ज्याच्या नशिबी साखर आहे, त्याला ती नेहमीच मिळते. म्हणजे अशांना नेहमी सुखच मिळते, भाग्यवान माणसाला कशाचीही उणी पडत नाही.


29. शहाण्याला मार शब्दाचा.
शहाणा माणूस फक्त शब्दाने ताळ्यावर येतो पण मूर्खाला माणसाला मार दिल्याशिवाय तो सुधारत नाही.


30. मूर्ती तितक्या प्रकृति.
निरनिराळी माणसे निरनिराळ्या स्वभावाची असतात.

31. भित्यापाठी ब्रह्मराक्षस.
भिणारा माणूस स्वतःवर संकटे ओढून घेतो.


32. बाप तसा बेटा.
बापाच्या अंगी जे गुण असतात तेच मुलाच्या अंगात उतरतात.


33. दैव देते आणि कर्म नेते
दैव अनुकूल असल्यास, आपणांस एखादी चांगली वस्तू प्राप्त होते. परंतु कर्म अनुकूल नसल्यास, ती वस्तू आपणाजवळ टिकत नाही.


34. एका हाताने टाळी वाजत नाही.
भांडणातील दोष एकाच पक्षाकडे असतं नाही.

35. कोळसा उगाळावा तितका काळांच.
वाईट गोष्ट कितीही तपासली तरीही त्यांतून वाईटच निघणार.


36. घरोघरी मातीच्या चुली.
सर्वत्र सारखीच परिस्थिती.


37. चोराच्या उलट्या बोंबा.
स्वतःच गुन्हा करणे पण दोष मात्र दुसऱ्याला दोष देणे.


38. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन.
आपल्या धरलेल्या अपेक्षाहुन अधिक जास्त लाभ होणे.


39. आई जेवू घालीना, बाप भीक मागू देईना.
दोन्ही कडून अडचण असणे .


40. आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे.
दुसन्यापासून आयत्या मिळालेल्या संपत्तीवर चैन करणे.


41. उथळ पाण्याला खळखळाट फार.
काम थोडेसे पण त्याचा गाजावाजा मात्र जास्त अस्तो.


42. चोर सोडून संन्याशाला सुळी देणे.
खऱ्या अपराध्याला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.


43. कधी तुपाशी, कधी उपाशी.
सांसारिक स्थिती नेहमी सारखी नसते, त्यात चढउतार हे असतातच.


44. कामापुरता मामा व ताकापुरती आजीबाई.
काम होई पर्यंतच गोड गोड बोलणे.


45. खाण तशी माती.
बीजाप्रमाणे अंकुर असतो, तसेच आई वडिलाप्रमाणे त्यांची मुले असतात.


46. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही.
मुळचा स्वभाव आयुष्यात कधीच बदलत नाही.


47. खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे.
मनात एक आणि बाहेर दुसरेच रूप. (दुटप्पीपणाने वागणे.)


48. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी.
उपकारकर्त्याचे उपकार स्मरून त्याची बाजू घेणे.


49. गर्वाचे घर खाली.
गर्वाचा किंवा अभिमानाचा अतिरेक केल्यास त्याचा परिणाम वाईटच होतो.


50. गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य.
दोघे दिसायला भिन्न असले तरी वस्तुतः एकच असतात.


51. घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून .
घर बांधताना किंवा लग्न करताना कोणकोणती संकटे येतील व खर्च किती होईल हे काही सांगता येत नाही. तसे
कोणतीही गोष्ट केल्याशिवाय त्यातील अडचणीची कल्पना येत नाही.


52. चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे.
53.प्रत्येकाला केव्हा ना केव्हातरी अनुकूल परिस्थिती प्राप्त होतेच.


54. पाची बोटे सारखी नसतात.
सर्व माणसे सारख्या स्वभावाची नसतात. प्रत्येकाचे वागणे व विचार हे वेगवेगळे असतात.


55. तळे राखी तो पाणी चाखी.
स्वाधीन केलेल्या गोष्टींचा तो थोडा तरी फायदा घेतोच.


56. दाम करी काम.
पैशाने सर्व कामे साध्य होतात.


57. थेंबे थेंबे तळे साचे.
हळूहळू संचय करणे.


58. पितळ उघडे पडणे .
गुपचुप केलेले कृत्य सर्वांना माहिती होणे .


59. प्रयत्नांती परमेश्वर .
कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही .


60. बड़ा घर पोकळ वासा.
माणूस फक्त गप्पा मारण्यातच पुढे पण कामाला मात्र मागे .


61. बारा गावच्या बारा बाभळी.
प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी असणे .


62. अंगाची लाही लाही होणे.
खूप संतापणे.


63. तळे राखील तो पाणी चाखील.
सोपावलेले काम पूर्ण करत असताना आपला फायदा करून घेणे.


64. आवळा देऊन कोहळा काढणे.
स्वार्थासाठी छोटी वस्तु देणे परंतु आपला मोठा फायदा करून घेणे.


65. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
वाईट माणसाशी संगत जीवाला धोका निर्माण करू शकते.


66. उंटावरून शेळ्या हाकणे.
कामामध्ये आळस, हलगर्जीपणा करणे.


67. डोंगर पोखरून उंदीर कढणे.
जास्त कष्ट करणे पण कमी फायदा होणे.


68. वासरात लंगडी गाय शहाणी.
अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो.


69. एका माळेचे मणी.
सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे.


70. हाजीर तो वजीर.
जो ऐन वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो.


71. उचलली जीभ लावली टाळ्याला.
दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे.


72. मारुतीचे शेपूट.
लांबत जाणारे काम .


73. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले.
मुर्खपणामुळे कामाच्या गोष्टी हातातून जाणे.


74. दुष्काळात तेरावा महिना.
एक संकट अस्ताणे अजून संकट येणे.


75. अति तेथे माती.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो.


76. आधी शिदोरी मग जेजूरी.
आधी भोजन मग देवपूजा.


77. इच्छा तेथे मार्ग.
एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.


78. अळी मिळी गुपचिळी
स्वतःच्या मनातील हेतूचा दुसर्याला सुगावा न लागू देण.

79. अर्धी खाव पण सुखानं खाव.
थोडेसेच असावे पण शांतीने व समाधानाने उपभोगावे.


80. दगडावरची रेघ.
न बदलणारी गोष्ट.


81. वारा पाहून पाठ फिरवावी.
वातावरण पाहून वागावे.


82. अक्कल बडी की लक्ष्मी बडी.
पैसा श्रेष्ठ की बुद्धी श्रेष्ठ.


83. विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर.
गरजेपुरते गोष्टी घेऊन फिरणे.


84. अंगापेक्षा भोंगा मोठा.
मूळ गोष्टींपेक्षा इतर गोष्टींचा बडेजाव मोठा असणे.


85. डोळ्यात केर आणि कानात फुंकर.
रोग एकीकडे आणि उपचार दुसरीकडे.


 

मराठी वाक्प्रचार, अर्थ आणि वाक्यात उपयोग | Vakprachar Arth Ani Vakyat Upyog

Spread the love

Leave a Reply