Zimmad | झिम्माड – भाग २ | Sneha Shinde

Zimmad | झिम्माड – भाग २ | Sneha Shinde

Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
Zimmad | झिम्माड - भाग २ पहाटे पावसाच्या आवाजाने जाग आली अजूनही बाहेर अंधारलेलंच होत. कूस बदलून पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला पण डोळ्यासमोरून तुझा चेहरा काही जाईना. वाटलं उठून तुला पत्र लिहावं माझ्या मनातल्या भावना शब्दात उतरवाव्यात अंगाला बोचणारा गारठा अंगभर शहारे आणत होता अगदी तुझा स्पर्श झाल्यावर येतो ना अगदी तसाच. अजूनही लाईटस आले नव्हते धडपडत मी दिवा लावून आणला दिव्याच्या अंधुक प्रकाशात डायरी उघडून लिहायला सुरुवात केली. मनातल्या आठवणी शब्दात उतरु लागल्या. एक एक शब्द काळजाला भिडणारा अगदी तुझ्याच सारखा. लिहता लिहता मन तुझ्या दुनियेत कधी पोहचलं कळल देखील नाही. तुला आठवते का आपली ती पहिली भेट? समुद्राच्या उसळत्या लाटा, हवेत पावसाळी गारवा उंचच उंच नारळींची दाटी. तू केव्हापासून माझी वाट पाहत उभा होतास. घाई घाईत मी पोहचले अन त्यांनतर आठवतंय का? तू असा एकटक माझ्याकडे बघत होतास…
Read More
Zimmad | झिम्माड -भाग १ | Sneha Shinde

Zimmad | झिम्माड -भाग १ | Sneha Shinde

Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
Zimmad | झिम्माड - भाग १      कोकणातला तो न थांबणार पाऊस गर्द हिरवी वनराई तुडुंब  भरलेल्या नद्या  मातीचा गंध पडवीत उभं राहून दारातल्या पागोळ्यांची शुभ्र पांढरी धार पाहताना तिला अलगद हातात घेउन तिच्याशी खेळण्याचा मोह काही आवरत नाही. एकदा हातावर पावसाचं  पाणी पडलं कि मन आपसूकच अंगणातल्या पावसात चिंब होऊन जात.कधी तरी मनाचं ऐकावं  असं स्वतःच स्वतःला सांगत मी कधी अंगणात पोहचते  माझं मलाच कळत नाही. एक एक थेंब अंग मोहरून जातो. एखादा खट्याळ थेंब तुझी आठवण करून देतो. अन पावसासोबत वाहवत जात मन तुझ्या मिठीत. अलगद एक थेंब गालावरून ओघळून ओठावर  येतो अन त्या आठवणिने हृदयाची धडधड वाढते .नजर आपसूकच खाली जाते हळू हळू डोळे मिटले जातात अन तुझ्या पिळदार बाहूंनी जखडून टाकलेलं असत मला. तुझ्या इतकं जवळ आल्याने स्पंदने वाढली आहेत. तुझ्या छातीवर डोकं ठेऊन असच पावसात भिजत …
Read More