नमस्कार मित्रांनो, आज आपण या ब्लॉग मध्ये आपल्या वापरातील मजेदार अशी मराठी कोडी | Marathi Kodi बघणार आहोत. या ब्लॉग मधील कोड्यांची ऊत्तरे तुम्हाला येत असतील तर तुम्ही कंमेंट करून ती आमच्या पर्यंत नक्की पोहोचवा. तसेच आमच्या युट्युब चॅनेल नक्की भेट दया
1.अशी कोणती गोष्ट आहे तुमची
जी बाकीचे लोक तुमच्यापेक्षा जास्त वापरतात ?
उत्तर आहे : नाव.
2.
छोटेसे कार्टे
संपूर्ण घर राखते.
उत्तर आहे : कुलूप.
3.
गोष्ट आहे मी अशी
मला घेता तुम्ही खाण्यासाठी
मात्र मला तुम्ही खात नाही
सांगा पाहू मी कोण ?
उत्तर आहे : ताट.
4.
असे फळ कोणते
त्याच्या पोटात दात असतात?
उत्तर आहे : डाळिंब.
5.
प्रत्येकाजवळ असणारी अशी गोष्ट कोणती
जी नेहमीच वाढत जाते पण कधीही कमी होत नाही?
उत्तर आहे : वय.
6.
डोळा असून सुद्धा
मी पाहू शकत नाही
उत्तर आहे : सुई.
7.
प्रश्न असा की उत्तर काय ?
उत्तर आहे : दिशा.
8.
तुम्ही जेवढे त्याच्या जवळ जाल,
तेवढा तो मोठा होत राहील.
सांगा पाहू मी कोण?
उत्तर आहे : डोंगर.
9.
अशी कोणती गोष्ट आहे,
जी आपण जागी असल्यावर वर जाते
आणि झोपी गेल्यावर खाली येते.
उत्तर आहे : डोळ्यांच्या पापण्या.
10.
माणसासाठी कोणती गोष्ट हानिकारक आहे?
पण लोक अजूनही ते पितात.
उत्तर आहे : राग.
10.
सर्वेशच्या वडिलांना 4 मुले आहेत.
सुरेश
रमेश आणि
गणेश तर
चौथ्या मुलाचे नाव काय आहे सांगा?
उत्तर आहे: चौथ्या मुलाचे नाव आहे सर्वेश. .
11.
दिसत नाही पण घातलेले आहे हा दागिना.
हे स्त्रीचे रत्न आहे.
उत्तर आहे : लज्जा. .
12.
कोण आहे जो
आपली सर्व कामे
आपल्या नाकाने करतो ?
उत्तर आहे : हत्ती. .
13.
एक गोष्ट जी
खायला कुणाला आवडत नाही
पण सर्वांना मिळते ?
उत्तर आहे : धोका.
14.
वाचण्यात आणि लिहिण्यात
दोन्ही ठिकाणी असते माझे काम
मी नाही कागद मी नाही पेन
सांगा काय आहे माझं नाव?
उत्तर आहे : चष्मा.
15.
अशी गोष्ट जी तुम्ही गिळू शकता
किंवा ती तुम्हाला गिळू शकते
सांगा पाहू ती आहे कोणती ?
उत्तर आहे : अहंकार.
16.
एका कोंबड्याने एका घराच्या छतावर अंडे दिले
तर ते कोणत्या बाजूला पडेल ?
उत्तर आहे : कोंबडी कधी अंडी देत नसतो.
17.
हिरव्या घरात लपले एक लाल घर
लाल घरात आहेत खूप लहान मुले
ओळखा पाहू मी कोण
?
उत्तर आहे : कलिंगड .
18.
कोणता तो चेहरा
सकाळपासून संध्याकाळ पर्यंत
आकाशाकडे पाहत राहतो हसत
उत्तर आहे : सूर्यफूल .
19.
एक मुलगा 100 फुटा च्या शिडीवरून पडला
तरीही त्याला काही जखम झाली नाही असे कसे?
उत्तर आहे : कारण तो पहिल्याच पायरीवर होता.
20.
कंबर बांधून घरात राहतो
काय आहे ते? मला सांगा?
उत्तर आहे : झाडू.
21.
दिवसा झोप काढुनी मी
फिरतो बाहेर रात्रीला मी
आहे असा प्रवासी मी
पाठीला दिवा बांधून मी
कोण आहे मी ?
उत्तर आहे : काजवा.
22.
अशी कोणती गोष्ट आहे
जी फाटल्यावर अजिबात आवाज येत नाही
उत्तर आहे : दूध.
23.
तीन अक्षरांचे माझे नाव
वाचा उलटे किंवा वाचा सरळ
मी आहे प्रवासाचे साधन
सांगा पाहू माझे नाव ?
उत्तर आहे : जहाज.
24.
दोन गुहेचे आहेत दोन रक्षक
दोन्ही आहेत उंच आणि आहेत काळेभोर
सांगा पाहू मी कोण
?
उत्तर आहे : मिशा.
25.
कोणत्या महिन्यात
लोक सर्वात कमी झोपतात
?
उत्तर आहे : फेब्रुवारी.
अशी अजून मराठी कोडी । Marathi Kodi पाहण्यासाठी आमच्या युट्युब चॅनेल ला भेट द्या .
26.
जर आपल्याला तहान लागली असेल,
तर ते आपण पिऊ शकतो.
जर आपल्याला भूक लागली असेल,
तर आपण ते खाऊ सुद्धा शकतो.
आणि थंडी वाजत असेल,
तर आपण त्याला जाळू सुद्धा शकतो
सांगा ते काय आहे?
उत्तर आहे : नारळ.
26.
चार खंडाचा आहे एक शहर
चार आड विना पाण्याचे
18 चोर आहेत त्या शहरात
एक राणी आणि एक शिपाई
मारून सर्वांना त्या आडात टाकी
ओळख पाहू मी कोण?
उत्तर आहे : कॅरम.
27.
एक वानर एक खारुताई आणि एक पक्षी
नारळाच्या झाडावर जोराने धावत होते
तर सांगा सर्वप्रथम केळी कुणाला मिळतील
उत्तर आहे : नारळाच्या झाडावर केळी नसतात.
28.
मुकुट माझ्या डोक्यावर आहे
जांभळा झगा माझ्या अंगावर आहे
आहेत मला काटे जरा सांभाळून
चविष्ट आहे मी खातात मला भाजून
सांगा पाहू मी आहे तरी कोण ?
उत्तर आहे : वांगे.