महात्मा ज्योतिराव फुले | Mahatma Jyotiba Phule

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ – २८ नोव्हेंबर १८९०) हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले.

महात्मा जोतीराव गोविंदराव फुले

महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.  खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी सन्माननीय महात्मा (संस्कृत: “महान आत्मा”, “पूज्य”) पदवी प्रदान केली होती.

महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “[ फुले-शाहू-आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र ]  ” असे म्हणतात.

Mahatma-Phule-Quotes

माणसाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तवा,ज्योती म्हणे.

Mahatma-Phule-Quotes

ध्येय नसलेली माणसे साबणाच्या फेसासारखी असतात,
काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात .

Mahatma-Phule-Quotes

समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता, नैतिकता,
प्रगती आणि समृद्धीचा विकास होणार नाही
जोपर्यंत त्याना शिक्षण दिले जात नाही .

Mahatma-Phule-Quotes

नवीन विचार तर दररोज येत असतात,
पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे .

Mahatma-Phule-Quotes

प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात
ज्यांचे निर्धार ठाम असतात ,
ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते.

Spread the love