श्री गणपतीची आरती | Shree Ganpati Aarti
॥ श्री गणपतीची आरती ॥ सुखकर्ता दुखहर्ता (म्हणजे सुख आणणारा व दु:ख दूर करणारा), ही एक प्रसिद्ध मराठी आरती आहे. ती हिंदु देवता गणपतीला उद्देशून रचलेले काव्य आहे. हे पद समर्थ रामदास (१६०८ – १६८२) ह्यांनी लिहिले आहे. ही आरती पूजेच्या शेवटी म्हणण्यात आलेल्या आरत्यांपैकी पहिली असते म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात ही आरती गणेश चतुर्थीपासून उत्सव काळात किंंवा नित्य पूजेतही म्हटली जाते. ॥ श्री गणपतीची आरती ॥ सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची। सर्वांगी सुन्दर उटि शेंदुराची। कण्ठी झळके माळ मुक्ताफळांची॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मनकामना पुरती॥ रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा। चन्दनाची उटि कुंकुमकेशरा। हिरे जड़ित मुकुट शोभतो बरा। रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ति। दर्शनमात्रे मनकामना पुरती॥ लम्बोदर पीताम्बर फणिवर बन्धना। सरळ सोण्ड वक्रतुण्ड त्रिनयना। दास रामाचा वाट…