Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

प्रश्न उत्तर
लोणार सरोवर लोणारचे सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे तिसरा सरोवर आहे. याची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली. हे सरोवर औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. अंतरावर आहे. लोणार हे बेसॉल्ट खडकातील एकमेव मोठे आघाती विवर आहे. याचे पाणी अल्कधर्मी आहे. लोणार सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार विवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.तसेच या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. त्यातील १५ मंदिरे विवरातच आहेत.आणखीन मंदिरे आहे. सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते.[३] पण २०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय ५,७०,००० ± ४७,००० वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था(U.S.A), युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी ,इंडिया इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि ,खारगपूर (इंडिया )यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे.
Read More
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

प्रश्न उत्तर
महाराष्ट्र महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र हे भारताच्या सर्वांत विकसनशिल राज्यांपैकी एक आहे. महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे. राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे. जवळपास ११ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. मुंबईत साधारण १.८ कोटी लोक राहतात. नागपूर शहर महाराष्ट्राची उपराजधानी आहे. मध्ययुगीन महाराष्ट्र सातवाहन राजवंश राष्ट्रकूट राजवंश, पश्चिम चालुक्य, मुघल आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा समावेश आहे. विस्तार १, १८, ८०९ चौरस मैल (३,०७, ७१० चौरस किमी) असून, तो पश्चिम आणि कर्नाटक, तेलंगणा, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि दादरा आणि नगर हवेली भारतीय राज्यांना अरबी समुद्र लागून आहे. महाराष्ट्राला जगद्गुरु संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर, संत चोखामेळा, संत एकनाथ, संत नामदेव, संत गाडगेबाबा यासारख्या अनेक महान संतांचा वारसा लाभला आहे, त्यामुळे या राज्यास "संतांची भूमी" असेदेखील म्हटले जाते. येथूनच अभिनेते, राजकारणी आणि क्रिकेटपटू तयार होतात. जगात महाराष्ट्राचे…
Read More
Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

प्रश्न उत्तर
महाराष्ट्रातील किल्ले राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड, मंगरुळगड इ. महत्त्वाचे किल्ले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होते. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे (ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही रायगडच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत. महाराष्ट्रातील हे सर्व किल्ले महाराष्ट्र देशाची शान आहेत. राज्यव्यवहारकोशात शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार रघुनाथपंत हनुमंते यांनी किल्ल्यांचे मुख्य ३ प्रकार सांगितले आहेत, १) गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला २) भुईकोट किला ३) द्वीपदुर्ग अथवा जंजिरा   Marathi Sarav Pariksha…
Read More
Tukaram Gatha | तुकाराम गाथा

Tukaram Gatha | तुकाराम गाथा

Tukaram Gatha | तुकाराम गाथा
संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत - कवी होते. त्यांंचा जन्म देेेहु या गावात वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. 'जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा!' अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख केला जातो. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळात संत तुकारामांनी आपल्या…

Zimmad | झिम्माड -भाग १ | Sneha Shinde

Zimmad | झिम्माड -भाग १ | Sneha Shinde

Zimmad | झिम्माड - Sneha Shinde
Zimmad | झिम्माड - भाग १      कोकणातला तो न थांबणार पाऊस गर्द हिरवी वनराई तुडुंब  भरलेल्या नद्या  मातीचा गंध पडवीत उभं राहून दारातल्या पागोळ्यांची शुभ्र पांढरी धार पाहताना तिला अलगद हातात घेउन तिच्याशी खेळण्याचा मोह काही आवरत नाही. एकदा हातावर पावसाचं  पाणी पडलं कि मन आपसूकच अंगणातल्या पावसात चिंब होऊन जात.कधी तरी मनाचं ऐकावं  असं स्वतःच स्वतःला सांगत मी कधी अंगणात पोहचते  माझं मलाच कळत नाही. एक एक थेंब अंग मोहरून जातो. एखादा खट्याळ थेंब तुझी आठवण करून देतो. अन पावसासोबत वाहवत जात मन तुझ्या मिठीत. अलगद एक थेंब गालावरून ओघळून ओठावर  येतो अन त्या आठवणिने हृदयाची धडधड वाढते .नजर आपसूकच खाली जाते हळू हळू डोळे मिटले जातात अन तुझ्या पिळदार बाहूंनी जखडून टाकलेलं असत मला. तुझ्या इतकं जवळ आल्याने स्पंदने वाढली आहेत. तुझ्या छातीवर डोकं ठेऊन असच पावसात भिजत …
Read More
Gautama Buddha | गौतम बुद्ध

Gautama Buddha | गौतम बुद्ध

Gautama Buddha | गौतम बुद्ध
Gautama Buddha | गौतम बुद्ध "बुद्ध" हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे, ‘बुद्ध’ या शब्दाचा अर्थ आहे 'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी' आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्‍नांनी मिळवली आहे. ‘संबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त स्वतःवर विजय मिळवलेला आणि स्वतः उत्कर्ष करू शकणारा महाज्ञानी बुद्ध, आणि ‘संमासंबुद्ध’ म्हणजे बुद्धत्व-संबोधी (ज्ञान) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध. बौद्ध अनुयायी लोक शाक्यमुनी गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच ‘संमासंबुद्ध’ मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. बुद्धांच्या धम्माला (धर्माला वा तत्त्वज्ञानाला) ‘बौद्ध धर्म' किंवा ‘बुद्धिझम’ म्हणतात. तथागत बुद्धांचा अनुयायांत दोन भाग पडतात. एक — बौद्ध भिक्खू - भिक्खूनींचा आणि दुसरा — बौद्ध उपासक - उपासिकांचा. बौद्ध धर्माच्या अनुयायांना "बौद्ध" किंवा "बुद्धिस्ट" म्हणतात. Gautama Buddha | गौतम बुद्ध  
Read More