Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

महाराष्ट्रातील किल्ले

राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड, मंगरुळगड इ. महत्त्वाचे किल्ले श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होते. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे (ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही रायगडच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत. महाराष्ट्रातील हे सर्व किल्ले महाराष्ट्र देशाची शान आहेत.

राज्यव्यवहारकोशात शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार रघुनाथपंत हनुमंते यांनी किल्ल्यांचे मुख्य ३ प्रकार सांगितले आहेत,

१) गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला

२) भुईकोट किला

३) द्वीपदुर्ग अथवा जंजिरा

 

Marathi Sarav Pariksha | मराठी सराव परीक्षा

Spread the love

Leave a Reply