शब्दसमूहाबद्दल एक शब्द
नमस्कार मित्रांनो, आज आपण या ब्लॉग मध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द । Shabd samuh baddal ek shabd बघणार आहोत. स्पर्धा परीक्षेत विचारला जाणारा मराठी व्याकरणातील एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द.- पाहिल्याबरोबर लगेच – प्रथमदर्शनी
- जन्मापासून मरेपर्यन्त – आजन्म
- कधीही मृत्यू न येणारा – अमर
- उपकार जाणणारा – कृतज्ञ
- संख्या मोजता न येणारा – असंख्य
- मिळूनमिसळून वागणारा – मनमिळाऊ
- विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा – वसतिगृह
- पडदा दूर करणे = अनावरण
- थोडक्यात समाधान मानणारा = अल्पसंतुष्ट
- कमी आयुष्य असलेला = अल्पायुषी, अल्पायू
- एकाला उद्देशून दुसऱ्यास बोलणे = अन्योक्ती
- मोजता येणार नाही इतके = असंख्य, अगणित
- अग्नीची पूजा करणारा = अग्निपूजक
- ज्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही असा = अद्वितीय, अजोड
- ज्याला एकही शत्रू नाही असा = अजातशत्रू
- विविध बाबींत प्रवीण असलेला = अष्टपैलू
- ज्याने लग्न केले नाही असा = अविवाहित (ब्रह्मचारी)
- ज्याचा थांग (खोली) लागत नाही असे = अथाग
- घरी पाहुणा म्हणून आलेला = अतिथी
- अतिशय उंच = मोजता येणार नाही इतके
- गुप्त बातम्या कढणारा – गुप्तहेर
- कोणतीही तक्रार न करता – विनातक्रार
- सतत द्वेष करणारा – दीर्घद्वेषी
- आईवडील नसणारा – अनाथ
- देवावर विश्वास ठेवणारा – आस्तिक
- चार रस्त्यांचा समूह – चौक
- झोपेच्या आधीन – निद्राधीन
- उपकार न जाणारा – कृतघ्न
- लहानापासून थोरांपर्यन्त – आबालवृद्ध
- पाहण्यासाठी जमलेले लोक – प्रेक्षक
- मनास आकर्षून घेणारे – मनमोहक
- गुरे बांधण्याची जागा – गोठा
- घोडे बांधण्याची जागा – पागा
- दररोज प्रसिद्ध होणारे – दैनिक
- आठवड्यातून प्रसिद्ध होणारे – साप्ताहिक
- पंधरवड्यातून प्रसिद्ध होणारे – पाक्षिक
- विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कृत्य = अतिक्रमण
- आकाशातील ताऱ्यांचा पट्टा = आकाशगगा
- जिवंत असेपर्यंत = आजन्म
- मरण येईपर्यंत = आमरण
- थोरांनी लहानांच्या प्रती व्यक्त केलेली सदिच्छा = आशीर्वाद
- मनाला आल्हाद देणारा = आल्हाददायक
- ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा = आजानुबाहू
- लग्नात द्यावयाची भेट = आहेर
- हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत = आसेतुहिमाचल
- नसलेली गोष्ट आहे असे वाटणे = आभास
- संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत = आपादमस्तक
- देव आहे असे मानणारा = आस्तिक
- स्वत:च लिहिलेले स्वत:चे चरित्र = आत्मवृत्त, आत्मचरित्र
- बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण = आबालवृद्ध
- अगदी पूर्वीपासून राहणारे मूळ रहिवासी = आदिवासी
- वाटेल तसा पैसा खर्च करणे = उधळपट्टी
- सतत पैसा खर्च करणारा = उधळ्या
- ज्याच्यावर उपकार झाले आहेत असा = उपकृत
- उदयाला येत असलेला = उदयोन्मुख
- शिल्लक राहिलेले = उर्वरित
- जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीही ठिकाणी राह शकणारा = उभयचर
- घरदार नसलेला = उपऱ्या, बेघर
- सूर्याचे उत्तरेकडे जाणे = उत्तरायण
- शापापासून सुटका = उ:शाप
- सतत उद्योगात मग्न असणारा = उद्यमशील
- हळूहळू घडून येणारा बदल = उत्क्रांती
- सतत एकटे राहण्याची आवड असलेला = एकलकोंडा
- महिन्यातून प्रसिद्ध होणारे – मासिक
- वर्षातून प्रसिद्ध होणारे – वार्षिक
- पाण्याने चहूबाजूंनी वेढलेले – द्वीप
- काहीही माहेत नसलेला – अनभिज्ञ
- कलेची आवड असणारा – कलावंत
- विक्री करणारा – विक्रेता
- अजिबात शत्रू नसणारा – अजातशत्रू
- जे होणे अशक्य आहे – असंभव
- सर्व काही जाणणारा – सर्वज्ञ
- दगडासारखे हृदय असणारा – पाषाणहृदयी
- चहाड्या करणारा – चहाडखोर
- जे माहीत नाही ते – अज्ञात
- कहीही न शिकलेले – अशिक्षित
- दुसऱ्यावर उपकार करणारा – परोपकारी
- रोज घडणारी हकीकत – दैनंदिनी
- दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारा – मार्गदर्शक
- सभेत धीटपणे बोलणारा – सभाधीट
- कानाला गोड वाटणारे – कर्णमधुर
- लोकांचे नेतृत्व करणारा – नेता
- सत्याचा आग्रह धरणारा – सत्याग्रही
- दगडावर कोरलेला लेख – शिलालेख
- कधीही न जिंकला जाणारा – अजिंक्य
- लोकांची वस्ती नसलेला भाग – निर्जन
- पसंत नसलेला – नापसंत
- देवळाच्या आतील भाग – गाभारा
- श्रम करून जगणारा – श्रमजीवी
- कायमचे लक्षात राहणारे – अविस्मरणीय
- श्रम न करता खाणारा = ऐतखाऊ
- लहान मुलाला झोपविण्यासाठी म्हटलेले गीत = अंगाईगीत
- अंग राखून काम करणारा = अंगचोर
- दुसऱ्याच्या ताब्यात असलेला = अंकित
- निरनिराळ्या राष्ट्रांतील = आंतरराष्ट्रीय
- आपले कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असा = कर्तव्यतत्पर, कर्तव्यदक्ष
- कर्तव्याकडे पाठ फिरविणारा = कर्तव्यपराङ्मुख
- जिचे डोळे कमलपुष्पाप्रमाणे सुंदर आहेत अशी = कमलाक्षी
- अंगी एखादी कला असणारा कलावान = कलाकार, कलावंत
- दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा = कनवाळू
- कष्टाने मिळणारी = कष्टसाध्य
- कानास गोड लागणारे = कर्णमधुर
- कामाची टाळाटाळ करणारा = कामचुकार
- भाकरी करण्याची लाकडी परात = काथवट
- सर्व इच्छा पूर्ण करणारी (पुराणात कल्पिलेली) गाय = कामधेनू
- कार्य करण्यास सक्षम असलेला = कार्यक्षम
- अंधाऱ्या रात्रीचा पंधरवडा = कृष्णपक्ष
- केलेले उपकार विसरणारा = कृतघ्
- धान्य वा तत्सम वस्तू साठविण्याची जागा = कोठार
- ज्याच्याकडे अनेक कोटी रुपये आहेत असा = कोट्यधीश
- कुंजात विहार करणारा = कुंजविहारी
- मडकी बनविणारा = कुंभार
- शीघ्रतेने किंवा अकस्मात घडून आलेला बदल = क्रांती
- सतत पैसे खर्च करणारा = खर्चिक
- आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा मित्र = खेळगडी
- जन्मत:च श्रीमंत असलेला = गर्भश्रीमंत
- जिची चाल हत्तीच्या चालीप्रमाणे डौलदार आहे अशी = गजगामिनी
- सापांचा खेळ करणारा = गारुडी
- गडाचा वा किल्ल्याचा प्रमुख अधिकारी = गडकर