मराठी चारोळी । Marathi charoli
नमस्कार मित्रानो आज आपण या ब्लॉग मध्ये मराठी चारोळी । Marathi charoli पाहणार आहोत. या चारोळी
कवी सागर साळवी । सागर Salavi यांच्या आहेत . आपणास हा ब्लॉग आवडल्यास नक्की शेअर करा .
काही क्षण अधनं मधनं
ठसका देऊन जातात,
शांत चालणाऱ्या हृदयाला
हिसका देऊन जातात
आठवणीतला थेंब सुद्धा
मी वाया जाऊ देणार नाही,
थेंब म्हणालं आठवणीला
तु ये मी येणार नाही.
आतून बघते मन
आभाळ दाटले का,
त्या ढगांना हे मन
चातक वाटले का ?
येतात वाहणारे थेंब
डोळ्यांच्या वाटणीला ,
एक हवी होती ओंझळ
काठांवर पापणीला
बेधुंद या मनाचा
अगणित का पसारा ,
येता पावसाची चाहूल
मन फुलवतो पिसारा .
काय देशील पुढच्या पिढीला
तुझ्याकडे नेमकं आहे काय ,
इतकं वजन आहे डोक्यावर
रुतत चाललेत तुझेच पाय .
तुझ्या अठवणींची बेल
मी बांधली दारावर ,
प्रत्येक वेळी वाजते
कोणीतरी आल्यावर .
ती शब्द सांडत गेली ,
मी वाक्यांच्या केल्या वेली .
मी नकळत वेचत होतो ,
तिच्या काळजाच्या साली .
ती शब्द सांडत गेली ,
मी वाक्यांच्या केल्या वेली .
मी नकळत वेचत होतो ,
तिच्या काळजाच्या साली .