वपु काळे पेशाने वास्तुविशारद म्हणजेच आर्किटेक्ट होते. त्यामुळे सौंदर्यदृष्टी नोकरीचाच भाग असल्याने जगाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोनच वेगळा होता. त्यांच्यामधील लेखक जग पहायचा मग वपु पहायचे. म्हणूनच त्यांनी कदाचित शब्दांचे राजवाडे आणि महाल बांधले असावेत.