वि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला.
"शरीरसुख हा काही मानवी जीवनाचा मुख्य निकष नाही .
तो निकष आहे आत्म्याचं समाधान. "
"जे मोकळ्या मुठीने आपले सर्वस्व देते ते खरे प्रेम !"
"मोहाचा पहिला क्षण हि पापाची पहिली पायरी असते. "
"स्वतःच्या पूजेत दंग असलेली माणसे नकळत मनाने अंधळी आणि हृदयाने बहिरी होतात." - ययाती
"या जगात ज्याला आपली शिकार होऊ द्याची नसेल ,
त्याने सतत इतरांची पारध करीत राहिले पाहिजे."
" धर्माचं उल्लंघन न करणाऱ्या उपभोगात पाप नाही ;
पण या जगात उपभोगापेक्षा श्रेष्ठ असा दुसरा आनंद आहे."
" स्वतःच्या संरक्षणाकरिता किंवा दुर्जनांच्या परिपत्याकरिता केलेली हिंसा हा धर्म होऊ शकतो. "
"अतृप्त शरीर आणि अपमानित मन यांची टोचणी मोठी विचित्र असते.
अगदी सर्पविषासारखी !
बाह्यतः सूक्ष्म , पण आतून तीव्र परीणाम करणारी ! "
सौंदर्याची पूजा हा 'स्त्री 'चा धर्म आहे.
ती कुठल्याही सुंदर वस्तूचा नाश करू शकत नाही.
"शरीरसुखाखेरीज पतीपत्नींना परस्परांच्या सहवासाची आणि सहानुभूतीची नितांत गरज असते "