स्वातंत्र्यवीर सावरकर | Swatantryaveer Savarkar
विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; मृत्यू : मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.
भाषाशुद्धीचा आग्रह धरून सावरकरांनी मराठी भाषेला ४५ शब्द दिले आहेत.
सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या शहरात झाला.त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव सावरकर हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई, ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ.स. १८९९च्या प्लेगला बळी पडले.
सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन” अशी शपथ घेतली. मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.
"उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतंही बलिदान वाया जात नाही."
"आत्यंतिक अहिंसेचे तत्त्व केव्हा केवळ अव्यवहार्य ,
मानवी जीवनाला घातक आणि म्हणून पूर्णपणे अनीतिकारक आहे. "
"या इहलोकातील सुकासाठी, कल्याणासाठी,
हितासाठी मनुष्याला काही नियम,
मूल्ये , आचार पाळावे लागतील.
त्यालाच 'धर्म ' असे म्हणतात."
'अहिंदू ' म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले
तरी
ते लाथाडून मी शेवटी 'हिंदू ' म्हणूनच मरेल.
समाजाची, राष्ट्राची इमारत धर्मग्रंथाच्या पायावर नव्हे,
तर विध्यांग्रथाच्या प्रबळ पायावर उभी केली पाहिजे.
तत्त्वज्ञान खूप झाले, विचार मांडणेही भरपूर झाले
याची आपल्या समाजात व राष्टात काहीच कमी नाही.
कमी आहे ती प्रत्यक्ष कार्य करणार्यांची
आपल्या राष्ट्राला धार्मिक अज्ञानाच्या तमोयुगातून
आजच्या सुधारलेल्या विज्ञानयुगात आणून सोडणे हे
आपले अत्यंत पवित्र कर्तव्य आहे.
हाच खरा धर्म आहे.
अज्ञानाचा शोध न लावता त्याला खरे मानणे हा धर्मभोळेपणा,
तर त्याला खोटे मानणे हा बुद्धि भोळेपणा .