सुधा मूर्ती | Sudha Murty यांचे प्रेरणादायी विचार
सुधा कुलकर्णी – मूर्ती (जन्म : शिगगाव-कर्नाटक, १९ ऑगस्ट १९५०) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. विमल कुलकर्णी आणि डॉ. आर.एच .कुलकर्णी हे त्यांचे आई वडील होत. ग्रामीण भागातील विकासासाठी त्या काम करत असतात. संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक एन.आर.नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्नी आहेत. त्या अमेरिकेतील कॅलटेक ह्या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांच्या, तसेच प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरुराज देशपांडे यांच्या पत्नी-जयश्री कुलकर्णी -देशपांडे– ह्यांच्या भगिनी आहेत. सुधा मूर्ती यांनी नऊहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह आहेत.
सुधा मूर्तीनी संगणक शास्त्रज्ञ व अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या. टाटा कंपन्यांसाठी त्यांनी पुणे, मुंबई आणि जमशेदपूर येथे काम केले आहे. शिवाय, पुण्याच्या ख्राईस्ट कॉलेजात त्या प्राध्यापक होत्या. बंगलोर विद्यापीठात त्या अभ्यागत प्राध्यापिका आहेत. इन्फोसिस या संस्थेच्या कार्यात त्यांचा विशेष सहभाग आहे.
" जेव्हा लोकांना फार कमी काळात
फार जास्त पैसा मिळून जातो ,
तेव्हा लोकांचं वागणं बदलतं. "
- वाइज अँड अदरवाईज
""आपल्या विद्यार्थ्याच्या ठायी जीवनाला सामोरे
जाण्याचा आत्मविश्वास निर्माण करणं ,
हेच शिक्षकाचं कर्तव्य आहे . "
- वाइज अँड अदरवाईज
" आपण गरिबी हटवू शकतो ,
पण माणसाची वृत्तीच जर लोभी असेल ,
तर ती कशी काय घालवणार आपण "
"तुलना करून दुसऱ्याचा
मत्सर करत बसण्यापेक्षा
स्वतःत सुधारणा करणं कितीतरी चांगलं ."
"माणसाने पुष्कळ धन मिळवले,
पण सत्कार्यासाठी जर दानधर्म केला नाही
तर तो वाईट मार्गाला लागेल. "
" एखाद्या स्त्रीची प्रकृती सुद्रुढ असेल,
ती हसरी असेल तर तिला दुसऱ्या कोणत्याही
दागिन्याची गरज पडत नाही .
दागिने न घालताच ती अधिक सुंदर दिसते "