नवरात्री 2025 — देवी दुर्गेला समर्पित नऊ दिवसांचा उत्सव (२२ — ३० सप्टेंबर 2025)
देवी दुर्गेला समर्पित नऊ दिवसांचा उत्सव, म्हणजेच नवरात्री, हा भक्ती आणि आनंदाचा काळ असतो. या वर्षी नवरात्री २२ सप्टेंबर २०२५ पासून सुरू होत आहे. या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाचा एक खास रंग असतो आणि देवीच्या विविध रूपांचा सन्मान करण्यासाठी लोक त्या रंगाचे कपडे घालतात आणि नवरात्री साजरी करतात,
१. प्रतिपदा — २२ सप्टेंबर २०२५ (सोमवार)
रंग: पांढरा — पवित्रता, शांतता आणि ज्ञानाचे प्रतीक.
देवी: शैलपुत्री — या दिवशी शैलपुत्रीची पूजा केली जाते.
२. द्वितीया — २३ सप्टेंबर २०२५ (मंगळवार)
रंग: लाल — शक्ती, आवेश आणि साहसाचे प्रतीक.
देवी: ब्रह्मचारिणी — या दिवशी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते.
३. तृतीया — २४ सप्टेंबर २०२५ (बुधवार)
रंग: निळा — स्थैर्य आणि दृढतेचे प्रतीक.
देवी: चंद्रघंटा — चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते.
४. चतुर्थी — २५ सप्टेंबर २०२५ (गुरुवार)
रंग: पिवळा — आनंद, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा.
देवी: कूष्मांडा — कूष्मांडा देवीची पूजा केली जाते.
५. पंचमी — २६ सप्टेंबर २०२५ (शुक्रवार)
रंग: हिरवा — निसर्ग, जीवन आणि शांतीचे प्रतीक.
देवी: स्कंदमाता — या दिवशी स्कंदमाता पूजली जाते.
६. षष्ठी — २७ सप्टेंबर २०२५ (शनिवार)
रंग: राखाडी — स्थिरता, सामर्थ्य आणि दृढतेचे चिन्ह.
देवी: कात्यायनी — कात्यायनीची पूजा केली जाते.
७. सप्तमी — २८ सप्टेंबर २०२५ (रविवार)
रंग: केशरी — उत्साह, तेज आणि धैर्याचे प्रतीक.
देवी: कालरात्रि — कालरात्रिची पूजा केली जाते.
८. अष्टमी — २९ सप्टेंबर २०२५ (सोमवार)
रंग: मोरोपंखी — निसर्ग सौंदर्य, दया आणि श्रद्धा यांचे प्रतीक.
देवी: महागौरी — महागौरीची पूजा केली जाते.
९. नवमी — ३० सप्टेंबर २०२५ (मंगळवार)
रंग: गुलाबी — प्रेम, आपुलकी आणि करुणा दर्शवतो.
देवी: सिद्धिदात्री — सिद्धिदात्रीची पूजा केली जाते.
Navratri 2025 — Colours in Short Table
दिवस | तारीख | रंग | देवीचे रूप |
---|---|---|---|
प्रतिपदा | २२ सप्टेंबर | पांढरा | शैलपुत्री |
द्वितीया | २३ सप्टेंबर | लाल | ब्रह्मचारिणी |
तृतीया | २४ सप्टेंबर | निळा | चंद्रघंटा |
चतुर्थी | २५ सप्टेंबर | पिवळा | कूष्मांडा |
पंचमी | २६ सप्टेंबर | हिरवा | स्कंदमाता |
षष्ठी | २७ सप्टेंबर | राखाडी | कात्यायनी |
सप्तमी | २८ सप्टेंबर | केशरी | कालरात्रि |
अष्टमी | २९ सप्टेंबर | मोरोपंखी | महागौरी |
नवमी | ३० सप्टेंबर | गुलाबी | सिद्धिदात्री |