जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
… रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने
मोगऱ्याच्या गजऱ्याचा मस्त सुटलाय सुगंध,
…सोबत मला मिळाला, जीवनाचा आनंद !
महादेवाला बेल, विष्णूला तुळस,
........ रावांचे नाव घ्यायला कसला हो आळस.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने
........ रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.
तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
.......... रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात
निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,
……… चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
गर गर गोल, फिरतो भवरा,
….... च नाव घेतो, मी तिचा नवरा.
दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र
....... रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र.
लग्नात्त लागतात हार आणी तुरे
..…. च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे.
चांदीच्या ताटात फणसाचे गरे.
........ राव दिसतात बरे पण वागतील तेव्हा खरे.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशि
रावांचे नाव घेते ...........च्या लग्नाच्या दिवशी.
एक होती चिऊ एक होती काऊ.
..... रावांच नाव घेते ,डोक नका खाऊ..
वन, टु, थ्री
..चं नाव घेते मला करा फ़्री.
चांदीच्या परातीत केशराचे पेढे चांदीच्या परातीत केशराचे पेढे,
आमचे हे सोडून बाकी सगळे वेडे.
आग्रहा खातर नाव घेते , आशीर्वाद द्या आग्रहाखातर नाव
घेते आशीर्वाद द्या रावांचा सहवास आयुष्यभर लाभावा .
पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल
........ रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.
एक होती चिऊ एक होती काऊ.
..... रावांच नाव घेते ,डोक नका खाऊ..