चारोळी हा मराठी साहित्यातील काव्याचा एक प्रकार आहे, चारोळी म्हणजे चार ओळींची कविता होय. आज आपण या सुंदर अश्या मराठी चारोळ्या | Marathi Charolya बघणार आहोत.
चार ओळींच्या कवितेला चारोळी असे म्हणतात. मोजक्या शब्दात आपल्या म्हणतील भावना व्यक्त करण्यासाठी चारोळ्या वापरल्या जातात. लग्न पत्रिका चारोळी, प्रेमाच्या चारोळ्या, मैत्री चारोळी, तर चला मग वाचूया या सुंदर अश्या मराठी चारोळ्या.
डोक्यातल्या तुझ्या चालत्या
विचारांना थांबा म्हणाव कधीतरी
वाटेत भेटून एक चहा आणि चार
प्रेमाचे शब्द बोलू केव्हातरी.
तुझ्या हातांचा स्पर्श झाल्यावर
लाजाळूचं झाडही पान पसरतं
तुझ्या स्पर्शाने मोहरून जाऊन
पान मिटायलाही ते विसरतं..