महात्मा गांधी | Mahatma Gandhi यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी (ऑक्टोबर २, १८६९ – जानेवारी ३०, १९४८) हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधीं हे एक वकील, वसाहतविरोधी राष्ट्रवादी नेते व राजकीय नैतिकतावादी होते. ते ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी महात्मा गांधींनी अहिंसक आंदोलनाचा वापर केला. नंतर जगभरातील अनेक नागरी हक्क आणि स्वातंत्र्य चळवळींना महात्मा गांधींकडून प्रेरणा मिळाली. महात्मा ( संस्कृत : “महान आत्मा”, “पूज्य”) असा त्यांचा सन्माननीय उल्लेख प्रथम दक्षिण आफ्रिकेत १९१४ मध्ये केला गेला. आता हा शब्द जगभरात त्यांच्यासाठी वापरला जातो.
२ ऑक्टोबर हा महात्मा गांधींचा जन्मदिवस हा भारतात गांधी जयंती म्हणून आणि जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात राष्ट्रीय सुट्टी असते. गांधींना सामान्यतः अनौपचारिकपणे भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. त्यांना सामान्यतः बापू (गुजराती : प्रेमाने वडिलांसाठीचे संबोधन म्हटले जाते.
महात्मा गांधी | Mahatma Gandhi यांचे सुविचार. हे सुविचार तुमच्या आयुष्याला देतील नवी दिशा देतील. | Mahatma Gandhi Suvichar in Marathi
"ज्या दिवसापासून स्त्रिया सुरक्षितपणे रात्री रस्त्यावर मोकळेपणाने चालू शकतात, त्या
दिवसपासून आपण असे म्हणू शकतो की भारताने खऱ्या अर्थाने स्वातंत्र मिळवले आहे. "
"कोणताही देश, त्या देशातल्या रहिवाशांनी हाल अपेष्टा सोसल्याशिवाय आणि स्वार्थत्याग केल्याशिवाय महत्पदाला चढलेला नाही."
"शांतता टिकवण्याचे सामर्थ्य नसेल,
तर तो नेता होऊ शकणार नाही."
"प्रथम ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतात, मग ते तुमच्यावर हसतात, मग ते तुमच्याशी लढतात, आणि मग तुम्ही जिंकता."
"स्वतःला शोधण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे इतरांच्या सेवेत स्वतःला गमावणे."
"बळजबरीने दुसऱ्याचे कल्याण करण्यात
त्याच्या व्यक्तिमत्वाची हानी होते."
"सामर्थ्य शारीरिक क्षमतेतून येत नाही. ते दुर्दम्य इच्छेपासून येते."
“आपल्याला या जगात हवा असलेला बदल पाहण्यासाठी आपण स्वतः तो बदल असणे आवश्यक आहे.”
“इतरांना संतुष्ट करण्यासाठी किंवा समस्येपासून मुक्त होण्यासाठी ‘होय’ म्हणण्यापेक्षा पूर्ण खात्रीसह ‘नाही’ म्हणणे चांगले.”