सुविचार | Quotes
विचार करणे म्हणजे विशिष्ट तर्हेने बुद्धीची पावले टाकणे. पुर्वानुभवाच्या मदतिने व्यक्तिच्या मनातल्या मनात होणारी प्रक्रिया म्हनजे विचार होय. विचारप्रक्रीयेमुळेच आजचा मानव चिंतनशील ,विचारशील बनला आहे.
Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे. Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ
Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ पंत सुमंत (डबीर) : रामचंद्र त्रिंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता. Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ
Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे. Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ
Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे. Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ
Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ पंत सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणार्या येणार्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते. छत्रपती शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकार्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता. Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ
Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकार्याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून तो तपासून महाराजांसमोर सादर करावा लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता. रामचंद्र नीळकंठ बावडेकर उर्फ रामचंद्रपंत अमात्य (१६५०-१७१६) हे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळातील राजनीतीचे प्रत्यक्ष ज्ञान असलेले एक प्रधान होते. रामचंद्रपंत अमात्यांची साथ केवळ शिवाजीराजेच नव्हे तर संभाजीराजे, राजाराम आणि ताराबाईंना लाभली. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलेली राजनीती अमात्यांनी आपल्या उत्तरायुष्यात लिहून काढली. तसेच कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज (दुसरे) यांच्या आज्ञेने त्यांच्या राजकुमारांना राज्यकारभाराचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी 'आज्ञापत्र' हा ग्रंथ लिहिला.. Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ…
Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ पंतप्रधान(पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे. Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ
बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणा देणारे विचार । Balasaheb Thakre Quotes बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार । Balasaheb Thakre Quotes बेंजामिन फ्रँकलिन | Benjamin Franklin
बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणा देणारे विचार । Balasaheb Thakre Quotes बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार । Balasaheb Thakre Quotes बेंजामिन फ्रँकलिन | Benjamin Franklin