बाळासाहेब ठाकरे | Balasaheb Thakre
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, इ.स. १९२६; पुणे – नोव्हेंबर १७, इ.स. २०१२; मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. बाळासाहेब ठाकरे | Balasaheb Thakre
ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. १९५० मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले.
"जीवनात एकदा निर्णय घेतला
की मागे फिरु नका ,
कारण मागे फिरणारे
इतिहास रचू शकत नाहीत. "
"मराठी हा सन्मान आहे,
मराठीला 'व्हाय '
विचारणाऱ्याला
त्याची माय आणि बाप
दाखवलाच पाहिजे. "
"नोकऱ्या मागण्यापेक्षा
नोकऱ्या देणारे होऊ
ही महत्त्वकांक्षा बाळगा !"