व. पु. काळे | Vasant Purushottam Kale
महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान पु.भा.भावे पुरस्कार फाय फाउडेशचा पुरस्कार आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद बहाल केले गेले.
आज व.पु.लौकिकार्थाने या दुनियेकडे जाऊन १४ वर्ष झाली.मला खात्री आहे कि आपण जिथे असशील तिथे सुद्धा रंग मनाचे लावून माणूस शोधत असाल कारण ती आपली सवयच होती म्हणा. ती वयाच्या कितव्या वर्षापासून तू दोस्त बनलास ते हि आठवत नाही.पण त्यामुळे कळत्या वयात जे काही कळाल ते भन्नाटच होत.
कारण व.पु.मराठी लिखाण मुळेसामान्य माणसाच्या जीवनाला भिडणारे ,समृद्ध करणारे होते. त्यामुळे आज हि कोणताही पुतळा न उभारता हि आज तमाम मराठी रसिक व.पु. वर जीवापाड प्रेम करत आहेत.आणि पुढील किमान ५०० वर्ष तरी हे लिखाण मराठी मनाला समृद्धकरीत राहिल. लेखक, कादंबरीकार,कथाकथनकार,अशी ख्याती असलेल्या व.पु.काळे अर्थात वसंत पुरुषोत्तम काळे यांचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी झाला. व.पु.हे पेशाने वास्तू विशारद होते.