मराठी म्हणी | Mhani Marthi
ज्यात लोकपरंपरेने आलेला अनुभव वा ज्ञान ग्रथित झालेले असते अशी लोकोक्ती, ते वाक्य म्हणजे म्हण मराठी म्हणी | Mhani In Marthi होय. किंवा कमी शब्दात परिस्थितीचा अन्वयार्थ अथवा तत्संबंधी सूचक, समर्पक, कालातीत भाष्य व्यक्त करणारा लोकपरंपरेने वापरला जाणाऱ्या अर्थपूर्ण शब्द समूहांना 'म्हण' असे म्हणतात.1. तहान लागल्यावर विहीर खणणे.ज्या वेळेस गरज पडेल त्या वेळेस त्या गोष्टीच्या शोध घेणे .2. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.दुष्ट व्यक्तींच्या कृत्याने चांगल्या माणसाचं नुकसान होत नाही.3. लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण.स्वतःला काहीही येत नाही पण लोकांना शहाणपणा सांगणे.4. आधी पोटोबा मग विठोबा.आधी स्वतःचा स्वार्थ साधने आणि मग दुसऱ्यांच्या विचार करणे5. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.अगोदरच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत अजुन आळशी अवस्था निर्माण होणे.6. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.वाईट लोकांच्या कृतीने व बोलल्याने आपल्याला काही फरक पडत नाही .7. आपला हात जगन्नाथ.आपल्या कर्तृत्वावर आपली प्रगति…