Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ
पंत सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणार्या येणार्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते. छत्रपती शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकार्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
Shivaji Maharaj Ashtapradhan Mandal | शिवाजी महाराजांचे अष्ट.प्रधानमंडळ