ज्ञानेश्वरांनी आपल्या काव्यरचना करताना बाप विठ्ठलसुत, बाप रखुमाईवर, ज्ञाना, ज्ञानाबाई, आणि ज्ञानदेव ही नावेही वापरली आहेत. ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानेश्वरांनी स्वतःची नाथसंप्रदायाची गुरुपरंपरा सांगितली आहे, ती अशी : आदिनाथ → मत्स्येंद्रनाथ → गोरक्षनाथ → गहिनीनाथ → निवृत्तिनाथ → ज्ञानेश्वर