कन्फ्युशियस | Confucius कन्फ़्यूशियस हे एक प्राचीन चिनी विचारवंत आणि सामाजिक तत्ववेत्ते होते. चीनी, जपानी, कोरियन व व्हिएतनामी लोकांच्या विचारसरणीवर व जीवनावर त्यांच्या शिकवणीचा आणि तत्वज्ञानाचा प्रभाव दिसुन येतो. कन्फ़्यूशियस हा चिनी विचारवंत होता. जगातील थोर विचारवंतांत गणना होणारा हा इ.स.पूर्व पाचव्या शतकात झाल्याचा अंदाज आहे.
Sudha Murty | सुधा मूर्ती सुधा कुळकर्णी-मूर्ती (जन्म : शिगगाव-कर्नाटक, १९ ऑगस्ट १९५०) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत.विमल कुलकर्णी आणि डॉ. आर.एच .कुलकर्णी हे त्यांचे आई वडील होत. ग्रामीण भागातील विकासासाठी त्या काम करत असतात. संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक एन.आर.नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्नी आहेत. त्या अमेरिकेतील कॅलटेक ह्या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास कुळकर्णी यांच्या, तसेच प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरुराज देशपांडे यांच्या पत्नी-जयश्री कुळकर्णी-देशपांडे- ह्यांच्या भगिनी आहेत. सुधा मूर्ती यांनी नऊहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह आहेत. Sudha Murty | सुधा मूर्ती
व. पु. काळे | Vasant Purushottam Kale महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान पु.भा.भावे पुरस्कार फाय फाउडेशचा पुरस्कार आणि अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनात अध्यक्षपद बहाल केले गेले. २६ जून २००१ रोजी ह्दयविकाराच्या झटक्याने व.पु.काळेचे मुंबईत निधन झाले. वसंत पुरुषोत्तम काळे पेशाने वास्तुविशारद होते. जून २६, इ.स. २००१ रोजी हृदयक्रिया बंद पडून त्यांचे निधन झाले. व पु काळे{{ माझ्या माझ्यापाशी}} व पु. या २ शब्दावर आज तमाम रसिक अजून हि प्रेम करत आहेत.त्यांचे विचार आज आदानप्रदान करत आहेत. व.पु.मुंबई महानगरपालिकेत होते.पेशाने वास्तुविशारद होते. पण वास्तू साकारताना त्यांनी किती सुंदर सुंदर पुस्तके आज आपल्या मराठी मातृभाषांत लिहिली याला तोड नाही .आज हि मी विचार करतो. कुठून आली हि उर्जा. व. पु. काळे | Vasant Purushottam Kale
स्वातंत्र्यवीर सावरकर | Swatantryaveer Savarkar विनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; मृत्यू : मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते. भाषाशुद्धीचा आग्रह धरून सावरकरांनी मराठी भाषेला ४५ शब्द दिले आहेत. सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या शहरात झाला.त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव सावरकर हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई, ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ.स. १८९९च्या प्लेगला बळी पडले. सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा…
नमस्कार, आपल्या मराठी बांधवांशी बोलत असताना एक गोष्ट नेहमीच प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आपल्यापैकी अनेकांना महाराष्ट्र, त्याचा इतिहास, भूगोल आणि इतरही अनेक गोष्टींबद्दल खूपच कमी ज्ञान आहे. उच्चशिक्षित मराठी तरुण-तरुणीदेखील याबाबाद अनभिज्ञ आहेत. त्यामुळेच 'मराठी शाळा' या आपल्या Page च्या माध्यमातून दर आठवड्याला आपण एक प्रश्न विचारणार आहोत ज्याचे उत्तर तुम्हाला Comment च्या माध्यमातून द्यायचे आहे. Post Share देखील करू शकता. धन्यवाद !!!
बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणा देणारे विचार । Balasaheb Thakre Quotes बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार । Balasaheb Thakre Quotes बेंजामिन फ्रँकलिन | Benjamin Franklin
Sudha Murty | सुधा मूर्ती सुधा मूर्तीनी संगणक शास्त्रज्ञ व अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या. टाटा कंपन्यांसाठी त्यांनी पुणे, मुंबई आणि जमशेदपूर येथे काम केले आहे. शिवाय, पुण्याच्या ख्राईस्ट कॉलेजात त्या प्राध्यापक होत्या. बंगलोर विद्यापीठात त्या अभ्यागत प्राध्यापिका आहेत. इन्फोसिस या संस्थेच्या कार्यात त्यांचा विशेष सहभाग आहे. Sudha Murty | सुधा मूर्ती