मराठी कोडी व उत्तरे  | Marathi Kodi

मराठी कोडी व उत्तरे | Marathi Kodi

मराठी व्याकरण | Marathi Vyakaran
नमस्कार मित्रांनो, आज आपण या ब्लॉग मध्ये आपल्या वापरातील मजेदार अशी मराठी कोडी | Marathi Kodi बघणार आहोत. या ब्लॉग मधील कोड्यांची ऊत्तरे तुम्हाला येत असतील तर तुम्ही कंमेंट करून ती आमच्या पर्यंत नक्की पोहोचवा. तसेच आमच्या युट्युब चॅनेल नक्की भेट दया 1.अशी कोणती गोष्ट आहे तुमची जी बाकीचे लोक तुमच्यापेक्षा जास्त वापरतात ? उत्तर आहे : नाव. 2. छोटेसे कार्टे संपूर्ण घर राखते. उत्तर आहे : कुलूप. 3. गोष्ट आहे मी अशी मला घेता तुम्ही खाण्यासाठी मात्र मला तुम्ही खात नाही सांगा पाहू मी कोण ? उत्तर आहे : ताट. 4. असे फळ कोणते त्याच्या पोटात दात असतात? उत्तर आहे : डाळिंब. 5. प्रत्येकाजवळ असणारी अशी गोष्ट कोणती जी नेहमीच वाढत जाते पण कधीही कमी होत नाही? उत्तर आहे : वय. 6. डोळा असून सुद्धा मी पाहू शकत नाही…
Read More
डॉ. अब्दुल कलाम यांचे सुविचार

डॉ. अब्दुल कलाम यांचे सुविचार

Quotes | सुविचार
डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम यांचे सुविचार डॉ.अब्दुल कलाम हे भारताचे माजी राष्ट्रपती, एक महान शिक्षक आणि प्रख्यात शास्त्रज्ञदेखील होते.भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम' यांच्या संघर्षमय जीवनातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. त्यांचे विचार हे आजही तरुण पिढीला प्रेरणा देतात. ए. पी.जे अब्दुल कलाम हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते. कलाम हे तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे वाढले होते, आणि तेथेच त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला. त्यांनी पुढील चार दशके शास्त्रज्ञ आणि विज्ञान प्रशासक म्हणून, प्रामुख्याने संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) येथे काम केले. "यशा बद्द्लची माझी निष्ठा कणखर असेल तर मला अपयशामुळे कधीच नैराश्य येणार नाही." "स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व कृतीने सत्यात…
Read More
लोकमान्य टिळक |  Lokmanya Tilak

लोकमान्य टिळक | Lokmanya Tilak

Quotes | सुविचार
लोकमान्य टिळक | Lokmanya Tilak कार्यात यश मिळो व ना मिळो, प्रयत्न करण्यात कधीही माघार घेता कामा नये. माणूस स्वभावानं कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होऊ शकत नाही. महान गोष्टी सहज मिळत नाहीत आणि सहज मिळणाऱ्या गोष्टी महान नसतात. देव पण त्यांचीच मदत करतो , जे स्वतःची मदत करतात. तुम्ही विपरीत परिस्थितीमध्ये संकटापासून आणि अपयशापसून घाबरून जाऊ नका, ते तर तुमच्या मार्गात येतीलच. देव आळशी लोकांसाठी अवतार घेत नाही, तो केवळ कष्टकरी लोकांनाच दिसतो, म्हणून काम करण्यास सुरवात करा. आई, वडील, गुरु आणि पूजनीय पुरुषांची उपासना करणे आणि त्यांची सेवा करणे सर्वात लोकप्रिय धर्म मानला जातो. .................
Read More
महात्मा ज्योतिराव फुले | Mahatma Jyotiba Phule

महात्मा ज्योतिराव फुले | Mahatma Jyotiba Phule

Mahatma Jyotiba Phule | महात्मा ज्योतिराव फुले, Quotes | सुविचार
महात्मा जोतीराव गोविंदराव फुलेमहात्मा जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ – २८ नोव्हेंबर १८९०) हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले.महात्मा जोतीराव गोविंदराव फुलेमहात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत. जोतिरावांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.  खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना १८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी सन्माननीय महात्मा (संस्कृत: “महान आत्मा”, “पूज्य”) पदवी प्रदान केली होती.महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास “[ फुले-शाहू-आंबेडकरांचा…
Read More
स्वामी विवेकानंद | Swami Vivekananda

स्वामी विवेकानंद | Swami Vivekananda

Quotes | सुविचार, Swami Vivekananda | स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ - ४ जुलै, १९०२ ) हे एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते. स्वामी विवेकानंद हे मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते.ते पाश्चात्य गूढवादाने प्रभावित झाले. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते. भारतातील हिंदू सुधारणा चळवळींमध्ये ते प्रमुख होते. त्यांनी ब्रिटिशशासित भारतात राष्ट्रवाद आणण्यात योगदान दिले. साहित्य, संगीत कला आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रांत विशेष रस असणारे विवेकानंद हे पाश्चात्य आणि भारतीय धर्मांशी जोडले गेले होते. त्यांचा सर्व धर्मीय अभ्यास होता. सर्व धर्मांचे सार तत्व एकच आहे अशी त्यांची मान्यता होती. स्वामी विवेकानंद हे एक महान व्यक्ती होते, त्यांनी आपल्या उदात्त कल्पना, अध्यात्मिक शहाणपण आणि सांस्कृतिक समज यांनी सर्वांना प्रभावित केले. स्वामी विवेकानंदांचे जीवन सर्वांना पुढे जाण्याची प्रेरणा देते आणि…
Read More
स्नेहा शिंदे

स्नेहा शिंदे

Uncategorized
नमस्कार मित्रांनो, आपण आपण कवयत्री Sneha Shinde | स्नेहा शिंदे ( रत्नागिरी ) यांच्या कविता पाहणार आहोत. आप्नस्ट त्यांच्या कविता आवडल्यास आपला अभिप्राय नक्की कळवा. !! विठु भेटीसी हा आला  !!सदा राहे संगे संत सज्जनांचा मेळा !!तोचि माझा विरंगुळा विठु म्हणे !!दर आषाढी कार्तिकी वारकरी गोळा होती !!विठू नामाचा गजर काय वर्णावी महती !!विठू माझा लेकुरवाळा त्यासी लेकरांचा लळा !!संता सांगाती कसला त्याने भक्तीचा रे मळा !!नाही गेला असा दिन पाहिला ना भक्तगण !! विठु उभा भक्ताविण त्याचे व्याकुळले मन !!आज एकादशी दिनी ओढ भक्तांची हि मनी !! हरी उदास बैठला नाही भजनाला कुणी !!जीव व्याकुळ तो झाला भक्त नसे संगतीला !! पंढरीचा पांडुरंग आज देउळीं कोंडला !!येता भक्तांचा सांगावा हरी हाकेसि धावला !!रखुमाईचा विठुराया आम्हा भक्तांना पावला !!ह्याची देही ह्याची डोळा आज विठ्ठल पाहिला !!भेटन्यासी भक्तगणा विठु दाराशीया आला…
Read More
स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर

Swatantryaveer Savarkar | स्वातंत्र्यवीर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर | Swatantryaveer Savarkarविनायक दामोदर सावरकर (जन्म : भगूर-नाशिक, २८ मे १८८३; मृत्यू : मुंबई, २६ फेब्रुवारी १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.भाषाशुद्धीचा आग्रह धरून सावरकरांनी मराठी भाषेला ४५ शब्द दिले आहेत.सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या शहरात झाला.त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव सावरकर हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई, ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ.स. १८९९च्या प्लेगला बळी पडले.सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता…
Read More
वि.स. खांडेकर

वि.स. खांडेकर

Vishnu Sakharam Khandekar | विष्णू सखाराम खांडेकर
वि.स.खांडेकर | V. S. Khandekarवि.स. खांडेकर यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगलीत झाला. त्यांच्या पूर्वायुष्यात, त्यांची नाटकांमध्ये अभिनय आणि दिग्दर्शन करण्याची आवड होती. वि.स.खांडेकरांचे लेखन ध्येयवादी आहे. अंतःकरणात समाजकल्याणाची व प्रगतीची तळमळ आहे. लालित्यपूर्ण भाषा, रम्य कल्पना, कोटीबाजपणा व समाजहिताचा प्रचार ही त्यांच्या लघुकथेची वैशिष्ट्ये आहेत. कल्पनाशक्ती अतिशय तल्लख असल्याने, तेजस्वी लेखनातून मनोरंजन करण्याबरोबर समाजजीवनावर भाष्य करणे हे त्यांच्या लेखनाचे स्वरूप होते. खांडेकरांच्या लेखनातून माणुसकीचा गहिवर दिसून येतो. त्यंच्या लेखनातून माणसावरील अपार श्रद्धा व्यक्त होते. रूपक कथा हा नवा प्रकार त्यांनी रुढ केला. त्यांनी कादंबरीसह कथा, कविता, लघुनिबंध, समीक्षा, चित्रपट-कथा, नाटक, व्यक्तिचित्रे, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत अगदी विपुल असे लेखन केले. वृत्तपत्रीय लेखन व ग्रंथ-संपादन या क्षेत्रांतही त्यांनी ठसा उमटवला. "शरीरसुख हा काही मानवी जीवनाचा मुख्य निकष नाही . तो निकष आहे आत्म्याचं समाधान. " "जे मोकळ्या मुठीने आपले सर्वस्व देते ते…
Read More
सुधा मूर्ती | Sudha Murty

सुधा मूर्ती | Sudha Murty

Sudha Murty | सुधा मूर्ती
सुधा मूर्ती | Sudha Murty यांचे प्रेरणादायी विचारसुधा कुलकर्णी - मूर्ती (जन्म : शिगगाव-कर्नाटक, १९ ऑगस्ट १९५०) या एक भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत. विमल कुलकर्णी आणि डॉ. आर.एच .कुलकर्णी हे त्यांचे आई वडील होत. ग्रामीण भागातील विकासासाठी त्या काम करत असतात. संगणक क्षेत्रातील व्यावसायिक आणि इन्फोसिस या प्रसिद्ध संस्थेचे सहसंस्थापक एन.आर.नारायणमूर्ती ह्यांच्या त्या पत्‍नी आहेत. त्या अमेरिकेतील कॅलटेक ह्या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी  यांच्या, तसेच प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरुराज देशपांडे यांच्या पत्‍नी-जयश्री कुलकर्णी -देशपांडे– ह्यांच्या भगिनी आहेत.  सुधा मूर्ती यांनी नऊहून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह आहेत.सुधा मूर्तीनी संगणक शास्त्रज्ञ व अभियंता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. टेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या. टाटा कंपन्यांसाठी त्यांनी पुणे, मुंबई आणि जमशेदपूर येथे काम केले आहे. शिवाय, पुण्याच्या ख्राईस्ट कॉलेजात त्या प्राध्यापक होत्या. बंगलोर विद्यापीठात त्या अभ्यागत प्राध्यापिका आहेत. इन्फोसिस या…
Read More