आपण बोलायलाच हवं | Shradha Waikar

shraddha waikar-apan bolaylach hawa

आपण बोलायलाच हवं | Shradha Waikar

आपण बोलायलाच हवं 
 बैचैन मनाच्या खोल तळाशी
साचलेत का काही शब्द
यंत्रांनी घेतल्या संवादाच्या जागा
यंत्र युगातील मने झाली निशब्द
आलंय का धोक्यात धोक्यात सामाजिक आरोग्य
मुला-मुलींना आहे का
संवादाचे समान स्वैर स्वातंत्र्य
भोळसट पणा, बुजरेपणा,लाजाळूपणा
यावरून मारताय का इतरांना टोमणा
स्व कृती,शब्द हि निरस विचारा स्वमना
हा समज गैरसमजाच्या मालिका
खरी-खोटी अर्धी-मुर्धी उत्तरं
दोघांच्या भांडणात रुसव्यात
कोमेजतात छोटी निरागस फुलपाखरं
प्रसार माध्यमांचा विळखा,
त्यांचा वापर अवाजवी
मारहाण, अपघात, बलात्कार
यांसारखी कृत्ये अमानवी
पाहत घालवी तास
दिवसांतील सतरा
‘Bipolar Disorder’ anxiety
यांचा वाढतोय खतरा
भूतकाळाच्या जखमा
वर्तमानाची अवहेलना
भविष्याची भीती
खरी की खोटी
देहापासून देहापल्याड नेणाऱ्या
आपणा सर्वांमधील निखळ आनंद
चैतन्य, उत्कटता, उत्साह
आणि मानसिकता हलवणारा दिवस हे सर्व हरवण्याआधी आपण बोलायलाच हवं…

 

आपण बोलायलाच हवं | श्रध्दा वैकर , सोलापूर

 

ताऱ्यांची सफर

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.

Back To Top
डॉक्टर होमी भाभा यांची संपूर्ण माहिती | Dr. Homi Bhabha Information In Marathi Marathi Sarav pariksha 54
डॉक्टर होमी भाभा यांची संपूर्ण माहिती | Dr. Homi Bhabha Information In Marathi Marathi Sarav pariksha 54