आपण आज पहिले मराठी उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
लक्ष्मण काशीनाथ किर्लोस्कर (२० जून १८६९ – २६ सप्टेंबर १९५६) हे किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक आहेत. लक्ष्मण किर्लोस्कर यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील गुर्लेहोसूर या खेड्यात 20 जून 1869 रोजी झाला. लक्ष्मणरावांना लहानपणापासूनच यांत्रिक वस्तूंचे प्रचंड आकर्षण होते त्याचबरोबर त्यांना चित्रकलेची देखील आवड होती. १८८५ साली लक्ष्मणराव यांनी मुंबईच्या ‘जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स’ मध्ये प्रवेश घेतला. परंतु रंगअंधत्व आढळुन आल्याने त्यांना त्यांचे शिक्षण मधेच थांबावावे लागले आणि त्यामुळे त्यांची चित्रकला सुटली. पण रेखाचित्राचा केलेला अभ्यास त्यांच्या कमी आला आणि पुढे त्याच शिक्षणाच्या जोरावर ‘विक्टोरिया टेक्नीकल इन्स्टिटयूट’ मध्ये कला शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. बाष्प अभियांत्रिकीचे अध्यापक म्हणून त्यांनी 45 रुपये प्रति महिना पगारावर काम करण्यास सुरुवात केली. उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या बद्दल संपूर्ण माहिती.
१८८८ मध्ये त्यांनी मुंबई सोडली आणि ते बेळगाव येथे राहायला आले. तेथे त्यांनी सायकल दुरुस्तीचे दुकान थाटले आणि याच दुकानाच्या माध्यमातुन त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकले. १९१० साला मधे लक्ष्मणरावांनी कुंडलातील माळरानावरती “किर्लोस्कर ब्रदर्स | Kirloskar Brothers ” या नावानं कारखाना उभारला. या कारखान्यात शेती व्यवसायासाठी लागणाऱ्या रहाट, नांगर, चरक, मोटार यांसारख्या वस्तूंचे उत्पादन सुरू केले. भांडवल वाढविण्यासाठी १९२० मध्ये त्यांनी कारखान्याचे कंपनीत रूपांतर केले. या कंपनीमध्ये त्यांनी हात पंप, लहानमोठे यांत्रिक पंप, घरगुती लोखंडी फर्निचर, इत्यादींचे उत्पादन सुरु केले.
औद्योगिक कारखाना चालविण्याचे कोणतेही शिक्षण न घेता किर्लोस्कर उद्योग समूह त्यांनी अतिशय परीश्रमाने उभा केला. अशा या आपल्या भारतातील पहिल्या मराठी उद्योजकावर २० जुन १९८९ मध्ये भारत सरकारने पोस्टाचे तिकीट काढले.