चिकूपिकू मराठी मासिक बद्दल संपूर्ण माहिती – ChikuPiku Review

मुलांच्या समृद्ध विकासासाठी, ‘चिकूपिकू’ 

‘मस्ती करू मजा करू 

मुलांचं बालपण समृध्द करू’ 

१ ते ८ वयोगटातील मुलांचं लाडकं मराठी मासिक 

मुलांमधील बौद्धिक उर्जेचा योग्य आणि प्रगतीशील वापर व्हावा म्हणून सुजाण पालक सतत प्रयत्नशील असतात, याकरता चिकूपिकूची गोष्टीची पुस्तकं हा पर्याय मुलांकरता नक्कीच उत्तम ठरू शकेल.

चिकूपिकू हे मासिक लहान मुलांच्या बहुरंगी बुद्धिमत्तेला वाव देणारं तर आहेच, सोबत मुलांसह आई-बाबांच्या पालकत्वाच्या प्रवासात मदत करणारं देखील आहे. 

चिकूपिकू काय आहे?

चिकूपिकू हे १ ते ८ वयोगटातील मुलांसाठीचे मराठी मासिक आहे. मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी, गोष्टी, गाणी, कोडी तसेच विविध अॅक्टिव्हीटीद्वारा मुलांमधील कल्पकता वाढीस लागावी अशाप्रकारे चिकूपिकूची आखणी करण्यात आली आहे. 

‘चिकूपिकू’ हा पालकत्व आणि मुलांच्या लहान वयातील समृद्ध वाढीच्या, विकासाच्या प्रवासामधला एक मित्र आहे. 

 

चिकूपिकू मासिकाचे सभासद होण्यासाठी वेबसाईटवर भेट द्या  – https://chikupiku.com/

 

मुलांचं चिकूपिकू   

चिकूपिकूमध्ये प्रत्येक महिन्याला मुलांना आवडतील अशा गोष्टी, चित्रं, गाणी, हातांनी करून बघायच्या सोप्या ऍक्टिव्हिटीज करताना मुलांना मज्जा तर येतेच सोबतच जेवताना, झोपताना मुलं ऑडिओ गोष्टीही ऐकू शकतात.  आई-बाबांसह गोष्टी वाचताना, ऐकताना मुलं एकत्र वेळ घालवतात.  चिकूपिकूतली चित्रं  रंगवताना,  हातांनी खेळणी करून बघताना कुटुंबाचा क्वालिटी टाईम छान जातो. 

चिकूपिकू हे मुलं आणि आई-बाबा या जोडीचं मासिक आहे. मुलांच्या सभोवती छान, आनंदी वातावरण तयार करणं आणि आई-बाबांना या प्रवासात साथ देणं हा चिकूपिकूचा उद्देश आहे.

 

चिकूपिकूच्या अंकातली मज्जा 

चिकूपिकूच्या प्रत्येक अंकात फक्त गोष्टी नव्हे तर मुलांना आवडतील, गुंतवून ठेवतील आणि करायला मज्जा येईल अशा अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. मुलांचं निसर्गाशी नातं जुळावं, निसर्गातल्या विविध गमतीजमतीविषयी त्यांना कळावं आणि उत्सुकता निर्माण व्हावी या दृष्टीकोनातून नेचर आणि मी, झाडी-गोडी अशी गोष्टीरूपी सदरे यामध्ये आहेत. ‘फिशिरा’ या गोष्टीद्वारे समुद्रातल्या गमतीजमती कळतात. ‘चिमणी चित्र’मधील चित्रं रंगवताना, ‘हातांची जादू’ मध्ये सहज सोप्या अॅक्टिव्हीटीज करताना मुलांना मज्जा येते. आर्टिस्ट कट्टा या आभा भागवत यांच्या सदरातून मुलांना विविध कलाकारांच्या चित्रशैलीविषयी माहिती मिळते. ‘माऊ-बाऊ’ मधून मुलांना स्वच्छता आणि आरोग्य जपण्यासाठी काय काळजी घ्यावी हे कळत. ‘सायन्स सैर’मधून मुलांना विज्ञानाच्या गोष्टी कळतात, शास्त्रज्ञांची ओळख होते.  याव्यतिरिक्त मराठी म्हणींची गंमत, कोडी, सोप्या बालकविता अंकात असतातच. मुलांच्याच वयाचे छोटे कॅरक्टर्स मुलांना अधिक जवळचे वाटतात त्यामुळे मुलं चिकूपिकूच्या प्रत्येक अंकाची आतुरतेने वाट पाहत असतात. 

 

मुलांचा स्क्रीनटाईम :

मोबाईल/टीव्ही यासारख्या स्क्रीनचे मुलांवरील परिणाम आपल्या सगळ्यांना माहित आहेतच.

मोबाईल आणि स्क्रीनच्या वापराचा शरीर, बुद्धी आणि वागणुकीवरही चुकीचा परिणाम होतो पण तरीही कामाच्या निमित्ताने किंवा इतर काहीही कारणाने सध्याच्या काळानुसार मोठ्यांना/पालकांना त्याचा वापर करणं भाग पडतं. मात्र लहान मुलांना हे समजावून सांगणं अवघड असतं. मुलांच्या स्क्रीन टाईमला कमी कसं करावं हा पालकांसमोर मोठ्ठा प्रश्न असतो अशावेळी मुलांना स्क्रीनऐवजी पुस्तकातील गोष्टी वाचून दाखवणं किंवा ऑडीओ स्टोरीज ऐकवता येऊ शकतात. मुलांसह असा वेळ घालवत, गप्पा मारत, चित्रं दाखवत, गोष्टी तयार करत हळू हळू स्क्रीन टाईम कमी होण्यास मदत होईल आणि घरात आनंदी संवाद वाढीस लागेल. 

 

विविध वयोगटासाठी एकच चिकूपिकू  

१ ते ३ वयोगटातील मुलांसाठी : या वयोगटातील मुलं फार लहान असतात, त्यांना अक्षर ओळख तितकीशी झालेली नसते. अशावेळी या मुलांसह अॅक्टिव्हीटीज करता येतील, चित्रं रंगवता येतील. गोष्टींची चित्रं दाखवत पुस्तकातल्या गोष्टी मुलांना ऐकवता येतील आणि ऑडीओ स्टोरीज  सुद्धा ऐकवता येतील. 

३ ते ६ वयोगटातील मुलांसाठी : या वयोगटातील मुलं स्वत: गोष्टी वाचण्याचा, चित्रं समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतील. अंकात दिलेल्या अॅक्टिव्हीटीज स्वत: करून बघू शकतील. 

६ ते ८ वयोगटातील मुलांसाठी : या वयोगटात मुलं जरा मोठी झालेली असतात त्यामुळे ती आपल्या छोट्या मित्रांना-भावाबहिणींना गोष्ट वाचून दाखवू शकतील, गोष्ट सांगता सांगता एखादी नवी गोष्ट, कविता तयार करून बघू शकतील. स्वत: च्या अॅक्टिव्हीटीज देखील तयार करू शकतील. 

ChikuPiku-Age-Group

मुलांकरता ऑडीओ स्टोरीज 

लहान मुलं ही ऐकून ऐकूनच शिकतात. सर्वप्रथम मुलांमध्ये श्रवण कौशल्य आणि मग भाषा कौशल्य यांचा विकास होतो. जे आपण शिकतो त्यातील 85% आपण ऐकून शिकतो. लहान मुलं गोष्टी ऐकताना एका वेगळ्या जगाची कल्पना करत असतात. त्यामुळे मुलांना रोज गोष्टी सांगितल्या किंवा ऐकवल्या पाहिजे. मुलांना जेवण भरवताना, झोपवताना, प्रवासात किंवा दिवसात कधीही या ऑडिओ गोष्टी ऐकवता येऊ शकतात. याचा फायदा मुलांचा स्क्रीन टाईम कमी करण्यासही नक्कीच होईल. 

 

चिकूपिकूच्या कुटुंबातलं एक सदस्य असल्याचा आम्हाला आनंद आहे!

बरेचदा पालक चिकूपिकूविषयी प्रतिक्रिया देताना हे वाक्य जरूर म्हणतात, ‘चिकूपिकू दर महिन्याला आमच्या घरी येतं. त्यातल्या गोष्टी, गाणी, अॅक्टिव्हीटीज आमच्या रोजच्या जीवनातला एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. चिकूपिकू वाचलं नाही असं होतंच नाही, त्यामुळे चिकूपिकूच्या कुटुंबातलं आम्ही आणि चिकूपिकू आमच्या कुटुंबातलं एक सदस्य असल्याचा आम्हाला खूप आनंद आहे.’

 ChikuPiku

चिकूपिकूचे पालक आणि मुलांकरता इतर उपक्रम – ChikuPiku Event

दर महिन्याला मुलांपर्यंत चिकूपिकूचे अंक तर पोहोचतातच पण त्यासोबतच मुलं आणि पालकांसाठी अनेक उपक्रम चिकूपिकू आयोजित करत असतं.

यामध्ये मुलांकरता काही कार्यशाळा उदा. कार्टून मेकिंग, मातीकाम, आर्ट आणि क्राफ्ट, विज्ञान कार्यशाळा पालकांची शाळा तसेच नाटुकलीसारखे कार्यक्रमही चिकूपिकू आयोजित करत असत.

पालकांसाठीही मुलांच्या योग्य विकासासंदर्भात वेगवेगळे विषय घेऊन अनेक ऑनलाईन आणि ऑफलाईन कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. ‘पालकांची शाळा’ हा त्यातलाच एक उपक्रम. मुलांसाठी पोषक अन्न, मुलांची वाढ, मुलांचं वागणं, मुलांशी संवाद कसा असावा यादृष्टीने यात विविध तज्ज्ञांचे संवाद सत्र आयोजित करण्यात येतात. 

 

एकंदरीत, जास्तीत जास्त मुलं आणि पालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास करताना चिकूपिकू हे मुलांचे बालपण अधिक समृद्ध करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. 

 

Spread the love

Leave a Reply