
आलंकारिक शब्द मराठी | Alankarik Shabd Marathi
ज्याप्रमाणे अलंकार हे माणसाचे सौंदर्यात वाढवतात, त्याचप्रमाणे अलंकारिक शब्द, मराठी म्हणी , मराठी वाक्यप्रचार हे सुद्धा आपल्या मराठी भाषेचे सौंदर्य वाढवतात. कमी शब्दांत जास्त व्यापक अर्थ हा अलंकारिक शब्दांतून व्यक्त केला जातो. अलंकारिक शब्दाचा शाब्दिक अर्थ विचारात न घेता त्याचा अर्थ समजून घेणे हे खूप महत्त्वाचे असते. या ब्लॉगमध्ये आपण मराठी व्याकरणाचा एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे अलंकारिक शब्द । Alankarik Shabd बघणार आहोत. मराठी आलंकारिक शब्द मराठी | Alankarik Shabd Marathi - मराठी व्याकरण | Marathi Vyakran गंडांतर – भीतिदायक संकट खुशालचेंडू – चैनखोर माणूस गुरूकिल्ली – मर्म रहस्य अकलेचा खंदक – अत्यंत मूर्ख माणूस गोगलगाय – गरीब निरुपद्रवी मनुष्य खेटरावी पूजा – अपशब्दाने खरडपट्टी काढणे गुळाचा गणपती – मंद बुद्धीचा अक्षरशत्रू – निरक्षर, अडाणी अरण्यरुदन – ज्याचा उपयोग नाही असे कृत्य गोगलगाय – गरीब निरुपद्रवी मनुष्य अळवावरचे पाणी –…