डॉक्टर होमी भाभा यांची संपूर्ण माहिती | Dr. Homi Bhabha Information in Marathi

डॉक्टर होमी भाभा यांची संपूर्ण माहिती | Dr. Homi Bhabha Information in Marathi

 

होमी भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणे आवड निर्माण झाली. या शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तिमत्त्व लाभलेले होमी भाभा उत्तम व्यक्ती होते. dr Homi Bhabha Information in Marathi

१९२७ साली वयाच्या अठराव्या वर्षी ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंड येथे गेले. तेथे केंब्रिज विद्यापीठात त्यांनी इंजिनियरिंगच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. ते अत्यंत हुशार विद्यार्थी होते. विद्यार्थीजीवनातच त्यांना भरपूर पारितोषिके मिळाली. केंब्रिजला असताना त्यांनी विद्युतनिर्मिती, चुंबकत्व, क्वांटम थिअरी, कॉस्मिक किरण इत्यादी विषयांवर संशोधन केले. सन १९३५ मध्ये त्यांना केंब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवी मिळाली. तिथे असतानाच होमी भाभांनी अणूविज्ञानातील ‘फिशन’ ह्या प्रक्रियेचा अभ्यास केला होता. भारतात परतल्यावर त्यांनी बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स येथे प्राध्यापक म्हणून काम स्वीकारले तेव्हा तिथे सर सी. व्ही रामन हे महान शास्त्रज्ञ प्रमुखपदावर होते.

डॉ. होमी जहांगीर भाभा यांना मिळालेले पुरस्कार – Dr Homi Jehangir Bhabha Awards

1. सन १९४३ साली एडम्स पुरस्कार.
2. सन १९४८ साली हॉपकिन्स पुरस्कार.
3. सन १९५९ साली कॅम्ब्रिज विश्वविद्यालया मार्फत त्यांना डॉ. ऑफ सायन्स पदवी बहाल केली.
4. सन १९५४ साली भारत सरकार तर्फे पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

डॉक्टर होमी भाभा यांची संपूर्ण माहिती | Dr. Homi Bhabha Information in Marathi

इलेक्ट्रॉन्सच्या कॅस्केट थियरीचे भाषांतर करताना त्यांनी पृथ्वीवर येताच वातावरणात प्रवेश करणाऱ्या वैश्विक किरणांवर काम केले होते. तसेच ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च‘ (टीआयएफआर) आणि ‘भाभा अणु संशोधन केंद्र‘ स्थापनेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. ते भारतीय अणु ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्षही होऊन गेले.

अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. होमी भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला. तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.

Maharashtra Desha | महाराष्ट्र देशा

 

 

Spread the love

Leave a Reply