स्नेहा शिंदे

नमस्कार मित्रांनो, आपण आपण कवयत्री Sneha Shinde | स्नेहा शिंदे ( रत्नागिरी ) यांच्या कविता पाहणार आहोत. आप्नस्ट त्यांच्या कविता आवडल्यास आपला अभिप्राय नक्की कळवा.

Marathi Kavita-Aaj Vitthal Pahila-Sneha Shinde

!! विठु भेटीसी हा आला  !!

सदा राहे संगे संत सज्जनांचा मेळा !!
तोचि माझा विरंगुळा विठु म्हणे !!

दर आषाढी कार्तिकी वारकरी गोळा होती !!
विठू नामाचा गजर काय वर्णावी महती !!

विठू माझा लेकुरवाळा त्यासी लेकरांचा लळा !!
संता सांगाती कसला त्याने भक्तीचा रे मळा !!

नाही गेला असा दिन पाहिला ना भक्तगण !!
विठु उभा भक्ताविण त्याचे व्याकुळले मन !!

आज एकादशी दिनी ओढ भक्तांची हि मनी !!
हरी उदास बैठला नाही भजनाला कुणी !!

जीव व्याकुळ तो झाला भक्त नसे संगतीला !!
पंढरीचा पांडुरंग आज देउळीं कोंडला !!

येता भक्तांचा सांगावा हरी हाकेसि धावला !!
रखुमाईचा विठुराया आम्हा भक्तांना पावला !!

ह्याची देही ह्याची डोळा आज विठ्ठल पाहिला !!
भेटन्यासी भक्तगणा विठु दाराशीया आला !!

स्नेहा शिंदे .

Spread the love