भारतीय रेल्वे (संक्षेप: भा.रे.) ही भारताची सरकार-नियंत्रित सार्वजनिक रेल्वेसेवा आहे. भारतातील रेल्वेमार्गांची एकूण लांबी ६७,४१५ कि.मी. इतकी आहे. भारतीय रेल्वे दररोज २३१ लाख प्रवासी आणि ३३ लाख टन मालाची वाहतूक करते. १२.२७ लाख कर्मचारी असलेली भारतीय रेल्वे, कर्मचारीसंख्येत जगातील आठवी सर्वांत मोठी व्यावसायिक संस्था आहे