व.पु.काळे | Va Pu Kale
व. पु. काळे | Vasant Purushottam Kale, हे मराठी भाषेतील खूप मोठे लेखक होते. ते वपु काळे या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी ६० पेक्षा जास्त पुस्तके लिहिली आहेत. पार्टनर, वपुर्झा, ही वाट एकटीची , ठिकरी ही पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.
ते प्रसिद्ध कथाकथनकार होते. त्यांचे १,६०० पेक्षा जास्त कथाकथनाचे कार्यक्रम झाले होते. ध्वनीमुद्रणाच्या माध्यमातून येणारे ते पहिले मराठी लेखक आहेत. त्यांनी भरपूर कथासंग्रह लिहले आहेत. काळे हे व्यवसायाने आर्किटेक्ट होते. २६ जून २००१ रोजी मुंबई येथे त्यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्यांच्या राहत्या घरामध्ये निधन झाले.
लेखक व. पु. काळे यांनी आयुष्यावर भरभरून लिहिले आहे. असेच काही त्यांचे प्रसिद्ध आणि आयुष्याला प्रेरणा देणारे कोट्स आम्ही तुम्हाला इथे देत आहोत. व. पु. काळे यांचे लिखाण इतके सुंदर आहे की मराठी साहित्यामध्ये या लिखाणाला विशेष स्थान आहे.
"संवाद दोनच माणसांचा होतो , त्यांच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात."
"घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्याची ऐपत नेहमीच कमी असते."
"चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो देवमाणूस."