मराठी शाळा

मराठी भाषेला ‘ज्ञानभाषा‘ आणि नंतर ‘विज्ञानभाषा‘ बनविणे हा ‘मराठी शाळा‘ चा मुख्य उद्देश आहे.
विविध भाषांतील आणि विविध क्षेत्रातील माहिती, ज्ञान आपल्या मराठी भाषेत उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत.
इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन या भाषांप्रमाणेच ‘मराठी’ ला देखील जगातील प्रमुख ‘ज्ञान’ भाषा बनविण्यासाठी ठोस कृती करणे फार आवश्यक बनले आहे.

संस्कृत भाषेत असलेले ज्ञानाचे भांडार आणि आपल्या संतांनी सांगितलेले अलौकिक ज्ञान सोप्या भाषेत जगासमोर मांडणे हे आपल्यासमोरील एक प्रमुख आव्हान आहे.
कार्य खूप मोठे आहे आणि आव्हाने देखील तितकीच असणार आहेत. परंतु ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ या उक्तीप्रमाणे आपण एकत्रितपणे
प्रयत्न केल्यास आपण ध्येय लवकर गाठू शकतो यात मात्र शंकाच नाही. या आमच्या प्रयत्नांत आपण देखील सहभागी होऊन ध्येयप्राप्तीसाठी सहकार्य करावे ही नम्र विनंती.

0
0
0
0
0

रमेश दिघे

ग्राफिक डिझायनर

sagar waikar

सागर वैकर

वेब डिझायनर