
नवरीसाठी मराठी उखाणे 2025 | सोपे आणि आकर्षक असे मुलींसाठी उखाणे
लग्नसमारंभ म्हटलं की उखाणे हा त्याचा अविभाज्य भाग आहे. नवरीसाठी मराठी उखाणे म्हणजे नव्या नवलाईने सुरू होणाऱ्या संसाराची गोड सुरुवात. लग्नाच्या वेळेस उखाणे घेण्याचा प्रघात आहे, जो लग्नाला अधिक रंगतदार बनवतो. तुम्ही जर नवरीसाठी मराठी उखाणे शोधत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयोगी ठरेल. आशीर्वादाची फुले, वेचावीत वाकून, ___रावांचे नाव घेते, तुमचा मान राखून. पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता, ….. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता. काय असे पुण्य केले मी, मलाच नाही ठाऊक, __________ रावांचे माझ्यावरचे प्रेम पाहून, सर्वजण झाले भावुक. रुपेरी सागरावर चंदेरी लाट, …. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट. परसात अंगण, अंगणात तुळस, …. नाव घ्यायचा मला नाही आळस. गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खून, ___रावांचे नाव घेते___ची सून. उखाणे घेण्याचे फायदे सांस्कृतिक परंपरा: उखाण्यांमुळे आपल्या संस्कृतीशी जोडलेपण टिकून राहते. आनंददायी वातावरण: उखाण्यामुळे समारंभात हास्याची फुलं फुलतात.…