२०० मराठी वाक्प्रचार — अर्थ व वाक्यात उपयोग
MPSC · PSI · STI · ASO · ZP · SSC Board · इयत्ता ८ वी ते १२ वी परीक्षेसाठी उपयुक्त
मराठी परीक्षेत वाक्प्रचारांवर आधारित प्रश्न नेहमीच विचारले जातात. या पेजवर २०० महत्वाचे मराठी वाक्प्रचार त्यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोगासह दिले आहेत. हे वाक्प्रचार MPSC, PSI, STI, ZP आणि SSC Board परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत.
वाक्प्रचार म्हणजे काय? शब्दसमूहांचा मराठी भाषेत वाक्यात वापर करताना त्यांच्या नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या व विशिष्ट अर्थाने भाषेत रूढ झालेल्या शब्द समूहास वाक्प्रचार असे म्हणतात.
अ — आ वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचार
१
अंगात वीज संचारणे
अचानक बळ येणे
देशभक्तीपर गाणी ऐकून नागरिकांच्या अंगात वीज संचारते.
२
अंगाची लाही लाही होणे
अतिशय संताप होणे
पूर्ण दिवस काम करूनही पैसे न मिळाल्याने दिनेशच्या अंगाची लाही लाही झाली.
३
अंग चोरून काम करणे
फारच थोडे काम करणे
अंग चोरून काम करणे ही आळशी लोकांची सवय असते.
४
अंगवळणी पडणे
सवय होणे
सकाळी लवकर उठून व्यायाम करणे हे भरतच्या अंगवळणी पडले आहे.
५
अंगावर शहारे येणे
खूप घाबरणे
भूकंपाने झालेली हानी पाहून मदत पथकातील सर्वांच्याच अंगावर शहारे आले.
६
अंगावर मूठभर मांस चढणे
धन्यता वाटणे
गुरूने केलेल्या स्तुतीमुळे मानसीच्या अंगावर मूठभर मांस चढले.
७
अंतर देणे
सोडून देणे, परित्याग करणे
मुलांनी आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना कधीही अंतर देऊ नये.
८
अंत होणे
मृत्यू होणे
अपघातामुळे अशोकचा दुःखद अंत झाला.
९
अधीर होणे
उत्सुक होणे
चार वर्षांनी आईला भेटण्यासाठी राहुल अधीर झाला होता.
१०
अन्नास मोताद होणे
गरीबीत दिवस काढणे
दुष्काळाने ग्रासलेल्या भागातील लोक अन्नास मोताद झाले.
११
अभिमान वाटणे
गर्व वाटणे
व्यवसायात मोठे यश मिळविल्यामुळे रमेशचा सर्वांना अभिमान वाटतो.
१२
अभिवादन करणे
नमस्कार करणे
विशाखाने आई बाबांना अभिवादन केले.
१३
अवहेलना करणे
अपमान करणे, अनादर करणे
माणसाच्या गरिबीवरून त्याची कधीही अवहेलना करू नये.
१४
अस्मान ठेंगणे होणे
गर्वाने फुगून जाणे
परदेशी जाण्याची संधी मिळाल्यावर सुमीतला अस्मान ठेंगणे झाले.
१५
अग्निप्रवेश करणे
स्वतःस जाळून घेणे
माधवरावांच्या मृत्यूनंतर रमाबाईंनी केलेला अग्निप्रवेश दुःखदायक होता.
१६
आण घेणे
शपथ घेणे
पोलिस झालेल्या प्रतिकने लाच न घेण्याची आण घेतली.
१७
आत्मसात करणे
शिकणे, आत्मसाद करणे
एखादी नवीन कला आत्मसात करावी लागते.
१८
आसन डळमळणे
बसलेला जम विस्कटणे
सत्ताधारी पक्षातील घोटाळे उघडकीस आल्याने मुख्यमंत्र्यांचे आसन डळमळीत झाले.
क — ख वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचार
१९
कंबर कसणे
हिमतीने तयार होणे
१० वी च्या परीक्षेत चांगले गुण मिळविण्यासाठी सुरेशने कंबर कसली.
२०
कंठस्नान घालणे
ठार मारणे
सीमेवर भारतीय सैनिकांनी शत्रूच्या सैनिकांना कंठस्नान घातले.
२१
कपाळाला हात लावणे
हताश होणे, निराश होणे
सामना सुरु होण्यापूर्वी पाऊस सुरु झाल्याने प्रेक्षकांनी कपाळाला हात लावला.
२२
कपाळमोक्ष होणे
मरण पावणे
दारू पिऊन गाडी चालविताना अपघात झाल्याने राकेशचा कपाळमोक्ष झाला.
२३
कान टोचणे
चूक लक्षात आणून देणे
परीक्षेत मोबाईल खेळणाऱ्या मानसीचे तिच्या वडिलांनी कान टोचले.
२४
कान उपटणे
कडक शब्दांत समजावणे
शाळेमध्ये दंगा करणाऱ्या दिनेशचे मुख्याध्यापकांनी कान उपटले.
२५
कान फुंकणे
मनात शंका निर्माण करणे
एकमेकांचे कान फुंकल्याने कुटुंबात अनेकदा वाद निर्माण होतात.
२६
कानावर घालणे
लक्षात आणून देणे
रोहितला कमी गुण मिळाल्याचे शिक्षकांनी त्याच्या वडिलांच्या कानावर घातले.
२७
काढता पाय घेणे
परिस्थिती पाहून निघून जाणे
वाद होण्याची चिन्हे दिसू लागताच राजेशने बैठकीतून काढता पाय घेतला.
२८
कापरे सुटणे
घाबरल्यामुळे थरथरणे
अचानक समोर आलेला वाघ पाहून राहुलच्या अंगाला कापरे सुटले.
२९
कस लावणे
सामर्थ्य पणाला लावणे
हिंदकेसरी होण्यासाठी गण्या पहेलवानाने प्रत्येक कुस्तीत आपला कस लावला.
३०
कसब दाखवणे
कौशल्य दाखवणे
कोणताही खेळ असो, खेळाडू त्यात आपले कसब दाखवतात.
३१
किरकिर करणे
सतत तक्रार करणे
मालकापाशी मजूर पगार कमी आहे म्हणून किरकिर करतात.
३२
कुंपणाने शेत खाणे
विश्वासू माणसाने घात करणे
व्यवस्थापकाने भ्रष्टाचार केल्याने कुंपणानेच शेत खाल्ल्याची चर्चा रंगली.
३३
केसाने गळा कापणे
विश्वासघात करणे
नोकराने चोरी करून सदाशिव रावांचा केसाने गळा कापला.
३४
खंड न पडणे
मध्ये न थांबणे
नित्यनेमाने देवपूजा करण्यात आजीचा कधीही खंड पडला नाही.
३५
खपणे
कष्ट करणे
चांगले पीक काढण्यासाठी शेतकरी दिवसभर शेतात खपतात.
३६
खांद्याला खांदा भिडवणे
एकत्र येऊन काम करणे
आजच्या युगात स्री-पुरुष एकमेकांच्या खांद्याला खांदा भिडवून काम करतात.
ग — घ वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचार
३७
गट्टी जमणे
मैत्री होणे
गावी आलेल्या मालूची गावातल्या शालूशी चांगली गट्टी जमली.
३८
गळ्यात गळा घालणे
खूप पक्की मैत्री असणे
सोनाली आणि प्रियांका नेहमी गळ्यात गळा घालून फिरतात.
३९
गुडघे टेकणे
शरण येणे
शिवाजी महाराजांच्या मावळ्यांपुढे मुघल फौजांनी गुडघे टेकले होते.
च — छ वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचार
४०
चेहरा खुलणे
आनंद होणे
लग्नाची तारीख ठरल्याचे कळताच मोनलचा चेहरा खुलला.
४१
चेहरा पडणे
दुःख होणे, वाईट वाटणे
अपेक्षित गुण न मिळाल्याने पल्लवीचा चेहरा पडला.
४२
छातीत धडधडणे
खूप भीती वाटणे
जंगलात अचानक सिंह समोर आल्याने पर्यटकांच्या छातीत धडधडले.
ड वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचार
४३
डाळ न शिजणे
काही उपाय न चालणे
साक्षीने दिपकला पटवायचे बरेच प्रयत्न केले पण तिची डाळ शिजली नाही.
४४
डोक्यावर खापर फोडणे
दोषी ठरवणे
अनेकदा निरपराध लोकांच्या डोक्यावर गुन्ह्याचे खापर फोडले जाते.
४५
डोक्यात वीज चमकणे
पटकन समजणे
कठीण गणित सुटत नव्हते पण एका क्षणाला दिनेशच्या डोक्यात वीज चमकली.
४६
डोळा असणे
लक्ष असणे, नजर असणे
शत्रूच्या प्रत्येक हालचालीवर आपल्या जवानांचा डोळा असतो.
४७
डोळा लागणे
झोप लागणे
दिवसभर काम केल्याने सौरभचा रात्री अंथरुणावर पडल्यावर लगेचच डोळा लागला.
४८
डोळे उघडणे
अनुभवाने सावध होणे
आजारी पडल्याने सुमितचे व्यायाम करण्याबाबत डोळे उघडले.
४९
डोळेझाक करणे
दुर्लक्ष करणे
माणूस नेहमीच स्वतःच्या चुकांकडे डोळेझाक करतो.
५०
डोळे निवणे
समाधानी होणे
विठ्ठलाच्या दर्शनाने वारकऱ्यांचे डोळे निवले.
५१
डोळे पांढरे होणे
प्रचंड भीती वाटणे
डोळ्यासमोर भीषण अपघात पाहताच सोहमचे डोळे पांढरे झाले.
५२
डोळे विस्फारणे
आश्चर्याने पाहणे
सचिनला अचानक पाहून त्याच्या चाहत्यांचे डोळे विस्फारले.
५३
डोळे मिटणे
मरण पावणे
क्रांतिकारकांनी देशासाठी लढताना आनंदाने डोळे मिटले.
५४
डोळे वटारणे
रागाने पाहणे
वर्गात दंगा करणाऱ्या मुलांकडे गुरुजींनी डोळे वटारून पाहिले.
५५
डोळ्यात धूळ फेकणे
खोटे बोलून फसवणे
जमिनीच्या लालसेपोटी सुधाकरने त्याच्या भावाच्या डोळ्यात धूळ फेकली.
त — थ वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचार
५६
तळपायाची आग मस्तकात जाणे
खूप राग येणे
मुलाचे खोटे बोलणे ऐकून राहुलच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
५७
तोंड देणे
सामना करणे
प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने तोंड देणाऱ्याचाच शेवटी यश मिळते.
५८
तोंड काळे करणे
कायमचे निघून जाणे
चोरी करताना सापडल्याने साखरामने गावातून तोंड काळे केले.
५९
तोंडचे पाणी पळणे
अतिशय घाबरणे
अवघड प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थ्यांच्या तोंडचे पाणी पळाले.
६०
तोंडघशी पडणे
खोटे पकडले जाणे
खोटं बोलणे पकडले गेल्याने वनिता तोंडघशी पडली.
६१
तोंडात बोट घालणे
आश्चर्यचकित होणे
बारावीत पहिला क्रमांक आल्याचे कळताच कोमलने तोंडात बोट घातले.
६२
तोंडाला तोंड देणे
भांडणे
दारू पिलेल्या माणसाच्या तोंडाला तोंड दिल्याने वाद वाढतात.
६३
तोंडाला पाणी सुटणे
हाव निर्माण होणे
गुलाबजाम पाहून तन्वीच्या तोंडाला पाणी सुटले.
६४
तोंडाला कुलूप घालणे
गप्प बसणे
परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अविनाश तोंडाला कुलूप घालून बसला होता.
द — ध वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचार
६५
दात ओठ खाणे
राग व्यक्त करणे
लोकांसमोर झालेला अपमान पाहून मयूर दात ओठ खात निघून गेला.
६६
दात विचकणे
निर्लज्जपणे हसणे
सायकलवरून मुलगा पडल्याचे दिसताच अभिषेक दात विचकून हसत होता.
६७
दिवस पालटणे
परिस्थिती बदलणे
खूप मेहनत केली तर आपले दिवस नक्की पालटतात.
६८
धडपड करणे
खूप कष्ट करणे
पोट भरण्यासाठी महादू दिवसभर काही ना काही धडपड करतो.
६९
धन्य होणे
कृतार्थ होणे
मुलाचे उज्ज्वल यश पाहून यशोदाबाई धन्य झाल्या.
७०
धास्ती घेणे
धसका घेणे
एकदा पाय घसरून पडल्यामुळे मीराबाई अंधारात जाण्याची धास्ती घेतली.
७१
धूम ठोकणे
पळून जाणे
पोलिसांना पाहताच चोरांनी धूम ठोकली.
न वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचार
७२
नवल वाटणे
आश्चर्य वाटणे
आईने आणलेली नवी सायकल पाहून विघ्नेशला नवल वाटले.
७३
नाक खुपसणे
गरज नसताना सहभागी होणे
नाक खुपसण्याच्या सवयीमुळे शोभाचे अनेकदा हसू झाले.
७४
नाक कापणे
अपमान करणे
मुलगा नापास झाल्याने मीरा काकूंचे सर्वांसमोर नाक कापले.
७५
नाक मुरडणे
नापसंती दर्शवणे
दिवाळीला आणलेला नवा ड्रेस न आवडल्याने सोनमने नाक मुरडले.
७६
नाकी नऊ येणे
दमछाक होणे
महागाईमुळे घर चालविताना सीमा काकूंच्या नाकी नऊ येतात.
७७
नाक घासणे
लाचार होऊन माफी मागणे
चुकीचा आरोप केल्याचे सिद्ध झाल्याने अनिकेतला सर्वांसमोर नाक घासावे लागले.
७८
नजर चुकवणे
गुपचूप हालचाल करणे
पोलिसांची नजर चुकवून चोर पळून गेले.
प — फ वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचार
७९
पदरी घेणे
स्वीकार करणे
पतीचे निधन झाल्यावर कमलाबाईंनी एकाकीपणाचे दुःख पदरी घेतले.
८०
पहारा देणे
राखण करणे
भारतीय सैनिक सीमेवर रात्रंदिवस कडक पहारा देतात.
८१
पाय घसरणे
मोहात फसणे
झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेक जणांचा पाय घसरतो.
८२
पाय मोकळे करणे
फिरायला जाणे
जेवण झाल्यावर लोक पाय मोकळे करायला जातात.
८३
पारंगत असणे
तरबेज असणे
वयाच्या तिसऱ्या वर्षी छोटा राहुल संगणक वापरण्यात पारंगत झाला.
८४
पोटाशी धरणे
माया करणे
कांगारू आपल्या पिलाला नेहमी पोटाशी धरून असते.
८५
पोटात ठेवणे
गुपित सांभाळणे
दहावीत नापास झाल्याची गोष्ट त्याने सर्वांपासून पोटात ठेवली.
८६
पोरकी होणे
अनाथ होणे
करोना साथीमुळे खूप मुले पोरकी झाली.
८७
प्रत्यय येणे
प्रचीती येणे
आषाढी एकादशीला भक्तांच्या विठ्ठलभक्तीचा प्रत्यय येतो.
८८
प्रभावित होणे
छाप पडणे
महात्मा गांधीजींचे देशकार्य पाहून विनोबा भावे प्रभावित झाले.
८९
प्रतीक्षा करणे
वाट पाहणे
बस येण्याची आम्ही बस स्थानकावर प्रतीक्षा करत होतो.
ब — भ वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचार
९०
भान ठेवणे
जाणीव ठेवणे
दुःखात साथ करणाऱ्या उपकारकर्त्याचे माणसाने नेहमी भान ठेवावे.
९१
भुरळ पडणे
मोह होणे
गीताने काढलेल्या सुंदर चित्राकडे पाहून मितालीला भुरळ पडली.
ह वर्णापासून सुरू होणारे वाक्प्रचार
९२
हात देणे
मदत करणे
गावातील संपदकाका गरीब लोकांना नेहमी मदतीचा हात देतात.
९३
हातातोंडाशी गाठ पडणे
जेमतेम खायला मिळणे
शेव सर्वांना वाटता वाटता रामूच्या हातातोंडाशी गाठ पडली.
९४
हाडे खिळखिळी करणे
खूप मार देणे
पोलिसांनी चोरांना पकडून त्यांची हाडे खिळखिळी केली.
९५
हेवा वाटणे
मत्सर वाटणे
सागरच्या कुशाग्र बुद्धिमत्तेचा त्याच्या मित्रांना नेहमी हेवा वाटतो.
इतर महत्वाचे वाक्प्रचार
९६
जिभेला हाड नसणे
वाटेल ते बोलणे
राग आलेली व्यक्ती जिभेला हाड नसल्याप्रमाणे बोलते.
९७
जीव की प्राण असणे
खूप प्रिय असणे
प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचा देश जीव की प्राण असतो.
९८
रक्ताचे पाणी करणे
अतिश्रम करणे
जॉब मिळविण्यासाठी रक्ताचे पाणी करावे लागते.
९९
लाडीगोडी लावणे
खुश करणे
लहान भाऊ आईने पैसे द्यावेत म्हणून लाडीगोडी लावत होता.
१००
स्तिमित होणे
आश्चर्यचकित होणे, थक्क होणे
मोनलचे नृत्य पाहून सर्व प्रेक्षक स्तिमित झाले.
वाक्प्रचार १०१ ते २०० नवीन
१०१
उचलबांगडी करणे
हाकलून देणे
महिला सहकाऱ्यांशी गैरवर्तन केल्यामुळे समीरची कामावरून उचलबांगडी केली.
१०२
उड्या मारणे
खूप आनंद होणे
परीक्षेत पहिला नंबर आल्याने सुनीलने आनंदाने उड्या मारल्या.
१०३
उर भरून येणे
भावनांनी मन भरणे
वर्षांनी मुलाला पाहताच आईचा उर भरून आला.
१०४
एक हाताने टाळी वाजत नाही
भांडणात दोन्ही बाजू जबाबदार असतात
त्यांच्या भांडणात दोघांचाही दोष आहे कारण एका हाताने टाळी वाजत नाही.
१०५
ओठावर येणे
बोलायची इच्छा होणे
खूप काही सांगायचे होते पण शब्द ओठावर येऊन परत गेले.
१०६
कळस चढवणे
शेवटची कमाल करणे
सर्व कामांचा कळस म्हणजे या प्रकल्पाचे यशस्वी उद्घाटन.
१०७
काळजाचा तुकडा
अत्यंत प्रिय व्यक्ती
मुलगा म्हणजे आईचा काळजाचा तुकडा असतो.
१०८
काळ्या पाण्याची शिक्षा
कठोर तुरुंगवास
देशद्रोहाच्या आरोपाखाली त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली.
१०९
कोलमडून पडणे
खचून जाणे
अचानक आलेल्या दुःखाने सुमन कोलमडून पडली.
११०
कोड पुरवणे
इच्छा पूर्ण करणे
आजोबा नेहमी नातवाचे कोड पुरवतात.
१११
गळा काढणे
जोरात रडणे
बाबा परत गेले तेव्हा लहान मुलाने गळा काढला.
११२
गाशा गुंडाळणे
कायमचे निघून जाणे
वाद वाढल्याने शेवटी सुरेशने गाशा गुंडाळला.
११३
घर डोक्यावर घेणे
खूप गोंधळ करणे
मुले खेळताना घर डोक्यावर घेतात.
११४
घोडे मारणे
मुद्दाम अडवणे
लाच न दिल्यामुळे क्लार्कने कामात घोडे मारले.
११५
चार चाँद लगाणे
अधिक शोभा वाढवणे
त्याच्या भाषणाने कार्यक्रमाला चार चाँद लागले.
११६
जड जाणे
कठीण वाटणे
आईपासून दूर राहणे सुमेधाला खूप जड जाते.
११७
जळफळणे
मत्सराने जळणे
दुसऱ्याचे यश पाहून हेव्याने जळफळण्यात काय अर्थ?
११८
जमीनदोस्त होणे
पूर्णपणे नष्ट होणे
भूकंपात संपूर्ण गाव जमीनदोस्त झाले.
११९
जीव टांगणीला लागणे
काळजीत असणे
मुलगा परत येईपर्यंत आईचा जीव टांगणीला लागला होता.
१२०
तारांबळ उडणे
गडबड होणे
अचानक पाहुणे आल्याने घरात तारांबळ उडाली.
१२१
दगा देणे
फसवणे, विश्वासघात करणे
विश्वासातल्या माणसाने दगा दिल्याने रमेश खचला.
१२२
दिवे लागणे
फजिती होणे
परीक्षेत काहीच न आल्याने विनोदचे दिवे लागले.
१२३
दुखणे काढणे
जुनी तक्रार उकरणे
प्रत्येक भांडणात ती जुने दुखणे काढते.
१२४
दुराव्यात राहणे
जवळ नसणे, दूर राहणे
नोकरीमुळे रोहन कुटुंबापासून दुराव्यात राहतो.
१२५
नाव कमावणे
प्रसिद्ध होणे
मेहनतीने त्याने आपल्या गावात मोठे नाव कमावले.
१२६
नाव बुडवणे
बदनाम करणे
मुलाच्या वाईट कृत्याने कुटुंबाचे नाव बुडाले.
१२७
पाण्यात बघणे
लाजणे
सर्वांसमोर कौतुक केल्याने मनीषा पाण्यात बघू लागली.
१२८
पाठ थोपटणे
शाबासकी देणे
मुलाने परीक्षेत यश मिळवल्याने बाबांनी त्याची पाठ थोपटली.
१२९
पाप धुणे
चुकांची भरपाई करणे
केलेल्या चुकांचे पाप धुण्यासाठी त्याने समाजसेवा केली.
१३०
फुकट घालवणे
वाया घालवणे
वेळ फुकट घालवण्यात काही अर्थ नाही.
१३१
बाशिंग बांधणे
तयार होणे, सज्ज होणे
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी बाशिंग बांधले आहे.
१३२
बाहू सरसावणे
कामासाठी सज्ज होणे
गावाच्या विकासासाठी तरुणांनी बाहू सरसावले.
१३३
बोट ठेवणे
दोष दाखवणे
दुसऱ्यावर बोट ठेवण्यापूर्वी स्वतःकडे पहावे.
१३४
मन मोकळे करणे
मनातील गोष्ट सांगणे
मित्राजवळ मन मोकळे केल्याने हलके वाटले.
१३५
मन लावणे
एकाग्रतेने काम करणे
मन लावून अभ्यास केला तर यश नक्की मिळते.
१३६
माती खाणे
पूर्ण नाश होणे
चुकीच्या निर्णयामुळे त्याचा व्यवसाय माती खाऊन गेला.
१३७
माफ करणे
क्षमा करणे
मोठ्या मनाने माफ करणे हे थोर माणसाचे लक्षण आहे.
१३८
मुजरा करणे
आदराने वाकणे, नमन करणे
शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला इतिहास मुजरा करतो.
१३९
यश पचवणे
यशाने न हुरळणे
यश पचवता येणे हे खऱ्या विजेत्याचे लक्षण आहे.
१४०
राग गिळणे
राग सहन करणे
बॉसचे चुकीचे बोलणे ऐकून रमेशने राग गिळला.
१४१
रान उठवणे
मोठा गोंधळ माजवणे
विरोधी पक्षाने संसदेत रान उठवले.
१४२
लक्ष वेधणे
लक्ष आकर्षित करणे
त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले.
१४३
वारा फिरणे
परिस्थिती बदलणे
निवडणुकीत वारा फिरला आणि सत्ताबदल झाला.
१४४
विडा उचलणे
जबाबदारी स्वीकारणे
गावाचा विकास करण्याचा विडा तरुण सरपंचाने उचलला.
१४५
शड्डू ठोकणे
आव्हान देणे
चॅम्पियनला हरवण्यासाठी नवीन खेळाडूने शड्डू ठोकला.
१४६
शिक्षा भोगणे
सजा सहन करणे
केलेल्या गुन्ह्याची शिक्षा प्रत्येकाला भोगावीच लागते.
१४७
सळो की पळो करणे
खूप त्रास देणे
उन्हाळ्याने सर्वांना सळो की पळो केले.
१४८
साखरपेरणी करणे
गोड गोड बोलून मनवणे
निवडणुकीत नेते नेहमी साखरपेरणी करतात.
१४९
साक्ष देणे
पुरावा म्हणून सांगणे
न्यायालयात खऱ्या घटनेची साक्ष देणे गरजेचे असते.
१५०
सुरुवात करणे
आरंभ करणे
प्रत्येक मोठ्या कामाची सुरुवात एका छोट्या पावलाने होते.
१५१
हाताशी धरणे
मदतीला घेणे
नव्या कामात अनुभवी माणसाला हाताशी धरणे योग्य असते.
१५२
हात झटकणे
जबाबदारी नाकारणे
चूक झाल्यावर हात झटकणे हा भ्याडपणा आहे.
१५३
हात पाय गाळणे
हताश होणे
संकट आले म्हणून हात पाय गाळू नयेत.
१५४
हात राखून वागणे
जपून वागणे
नव्या ठिकाणी हात राखून वागणे शहाणपणाचे असते.
१५५
कंठ दाटणे
भावनांनी घसा भरून येणे
आजोबांची आठवण झाल्याने त्याचा कंठ दाटला.
१५६
गाव जेवण घालणे
सर्वांना जेवण देणे
मुलाच्या यशाने खूश होऊन त्यांनी गाव जेवण घातले.
१५७
कळ काढणे
कठीण काळ सहन करणे
गरिबीतही त्यांनी हसत हसत कळ काढली.
१५८
दबा धरणे
लपून थांबणे
शिकारीची वाट पाहत वाघ दबा धरून बसला होता.
१५९
नशीब उघडणे
भाग्य बदलणे
मेहनतीने त्याचे नशीब उघडले.
१६०
फणा काढणे
रागाने उठणे
अपमान झाल्याने तो फणा काढून उभा राहिला.
१६१
बाजू घेणे
समर्थन करणे
न्यायाधीशाने नेहमी सत्याची बाजू घेतली.
१६२
मुसंडी मारणे
झपाट्याने पुढे जाणे
स्पर्धेत शेवटी रामने मुसंडी मारून पहिले स्थान मिळवले.
१६३
यश खेचणे
मेहनतीने यश मिळवणे
जिद्दीने अभ्यास करून त्याने यश खेचले.
१६४
रंग भरणे
उत्साह आणण्याने
त्याच्या येण्याने कार्यक्रमात रंग भरला.
१६५
लाज राखणे
मान टिकवणे
खेळाडूने देशाची लाज राखली.
१६६
वचन पाळणे
दिलेले वचन पूर्ण करणे
दिलेले वचन पाळणे हे खऱ्या माणसाचे लक्षण आहे.
१६७
वाटा फुटणे
वेगळे होणे
दोन मित्रांचे मतभेद वाढल्याने त्यांचे वाटा फुटले.
१६८
शब्द पाळणे
वचन पूर्ण करणे
रमाकांत नेहमी आपला शब्द पाळतात.
१६९
संकट ओढवणे
संकट येणे
चुकीच्या निर्णयामुळे मोठे संकट ओढवले.
१७०
साथ सोडणे
मदत करणे बंद करणे
कठीण काळात मित्रांनी साथ सोडू नये.
१७१
हिम्मत हारणे
धैर्य सोडणे
एकदा अपयश आले म्हणून हिम्मत हारू नये.
१७२
आग लावणे
भांडण लावणे
दोघांमध्ये आग लावणे हे त्याचे काम आहे.
१७३
खुलासा करणे
स्पष्टीकरण देणे
संशय दूर करण्यासाठी त्याने खुलासा केला.
१७४
गाज असणे
दरारा असणे
शिवाजी महाराजांची गाज सगळ्या शत्रूंवर होती.
१७५
घेर पडणे
वेढा घालणे
पोलिसांनी चोरांच्या अड्ड्याला घेर घातला.
१७६
चाचपडणे
अंदाज घेत पुढे जाणे
अंधारात वाट शोधताना राहुल चाचपडत होता.
१७७
जळत्या निखाऱ्यावर बसणे
खूप त्रासात असणे
कर्जाच्या बोज्याखाली तो जळत्या निखाऱ्यावर बसल्यासारखा आहे.
१७८
ठणका भरणे
वेदना होणे
दात किडल्याने रात्रभर ठणका भरत राहिला.
१७९
डोळे फिरणे
वेडे होणे, बेशुद्ध होणे
उन्हात फिरल्याने त्याचे डोळे फिरले.
१८०
तंगडी पसरणे
आळशीपणे बसणे
आरामात तंगडी पसरून बसणे त्याला आवडते.
१८१
दम काढणे
त्रास देणे
उन्हाळ्याने सर्वांचा दम काढला.
१८२
नाक दाबणे
दुसऱ्याला नमवणे
स्पर्धेत त्याने सर्व प्रतिस्पर्ध्यांचे नाक दाबले.
१८३
पाचावर धारण बसणे
खूप घाबरणे
पोलिस पाहताच चोराच्या पाचावर धारण बसली.
१८४
फटका बसणे
नुकसान होणे
महापुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.
१८५
बसल्या जागी
एकाच जागी राहून
इंटरनेटमुळे बसल्या जागी जगाची माहिती मिळते.
१८६
मार्ग काढणे
उपाय शोधणे
कितीही अवघड प्रश्न असो, शांतपणे मार्ग काढता येतो.
१८७
माघार घेणे
परत फिरणे
कठीण प्रश्न पाहून माघार घेणे योग्य नाही.
१८८
मुळावर येणे
नाश करणे
व्यसन माणसाच्या मुळावर येते.
१८९
रंग उडणे
फिके पडणे, घाबरणे
परीक्षेचे निकाल ऐकताच त्याचा रंग उडाला.
१९०
लक्ष्य साधणे
उद्दिष्ट पूर्ण करणे
एकाग्रतेने अभ्यास केल्याने त्याने लक्ष्य साधले.
१९१
वादळात सापडणे
मोठ्या संकटात अडकणे
कर्जाच्या वादळात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत मिळाली.
१९२
शब्द उचलणे
जबाबदारी घेणे
कामाचा शब्द उचलल्यावर ते पूर्ण करणे गरजेचे आहे.
१९३
सावध राहणे
जागरूक राहणे
परीक्षेत कोणत्याही गोष्टीसाठी सावध राहणे महत्वाचे असते.
१९४
हात उचलणे
मार देणे
स्त्रियांवर हात उचलणे हे कायद्याने गुन्हा आहे.
१९५
हात ओला करणे
लाच देणे
हात ओला केल्याशिवाय काम होत नाही असे म्हणतात.
१९६
हात धुऊन मागे लागणे
सतत मागे लागणे
कर्जवसुलीसाठी सावकार हात धुऊन मागे लागला.
१९७
हात पसरणे
भीक मागणे, मदत मागणे
स्वावलंबनाने जगा, कधी हात पसरू नका.
१९८
हृदय हेलावणे
मन द्रवणे
अनाथ मुलांची अवस्था पाहून सर्वांचे हृदय हेलावले.
१९९
क्षमा मागणे
माफी मागणे
चूक झाल्यावर लगेच क्षमा मागणे हे शहाणपणाचे असते.
२००
जोम असणे
उत्साह असणे, ताकद असणे
वयाच्या ७० व्या वर्षीही आजोबांमध्ये तरुणांसारखा जोम आहे.
📚 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
वाक्प्रचार म्हणजे काय?
शब्दांचा समूह जो नेहमीच्या अर्थापेक्षा वेगळ्या विशिष्ट अर्थाने वापरला जातो त्यास वाक्प्रचार म्हणतात.
MPSC परीक्षेत किती वाक्प्रचार विचारले जातात?
MPSC परीक्षेत साधारणतः ५ ते १० वाक्प्रचारांवर आधारित प्रश्न विचारले जातात. त्यामुळे किमान २०० वाक्प्रचार पाठ असणे आवश्यक आहे.
वाक्प्रचार आणि म्हण यात काय फरक आहे?
वाक्प्रचार हा अपूर्ण वाक्यात वापरला जातो तर म्हण ही स्वतंत्र पूर्ण विचार व्यक्त करते. वाक्प्रचाराला क्रियापद जोडावे लागते.
वाक्प्रचार PDF कुठे मिळेल?
मराठी शाळा वेबसाईटवर मराठी वाक्प्रचारांचे PDF उपलब्ध आहे. खालील लिंकवर क्लिक करा.





